शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पाकला ‘दहशतवादी राष्ट्र’ घोषित करा!

By admin | Updated: April 24, 2017 02:07 IST

पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. त्यासाठी दुसऱ्या देशांची वाट बघण्याची गरज नाही

ठाणे : पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी. त्यासाठी दुसऱ्या देशांची वाट बघण्याची गरज नाही, असे परखड मत एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले. तसेच, पाकिस्तानबरोबर असलेले व्यापारी व्यवहारही थांबवावे, असेही ते म्हणाले. गडकरी रंगायतन येथे सुरू असलेल्या एकोणतिसाव्या अ.भा. सावरकर साहित्य संमेलनात शनिवारी ‘भारताची संरक्षण सिद्धता’ हा परिसंवाद झाला. त्यावेळी गोखले बोलत होते. ते म्हणाले की, देशात शांतता असल्याशिवाय प्रगती होत नाही. शांततेसाठी संरक्षण सिद्धताही लागते. आपल्या देशात शांतता आणि संरक्षण सिद्धता आहे, म्हणून आपली प्रगती होत आहे. शांतता आणि संघर्ष ही आजची गोष्ट नाही, तर रामायण-महाभारतापासून चालत आले आहे. ‘संरक्षणसेना’ या शब्दापेक्षा ‘सशस्त्रसेना’ हा शब्द मला योग्य वाटतो. कारण, ‘संरक्षण’ या शब्दात कमकुवतपणा जाणवतो. कोणत्याही देशांतील युद्ध हे त्या-त्या देशांनी अटींवर थांबवले पाहिजे. राजकारणी आणि संरक्षण दलात समन्वय असला पाहिजे. संरक्षण दलाला निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी १९६५ साली झालेल्या युद्धाच्यावेळी तसे स्वातंत्र्य दिले होते. यामुळे सैन्याचे मनोबल वाढते. सैन्याचे नैतिक बळ वाढवण्यासाठी तसे नेतृत्व असले पाहिजे. ते पुढे म्हणाले की, कारगीलच्या युद्धात वापरण्यात आलेली युद्ध साधनसामग्री ही आपल्याला आयात करावी लागली होती. त्यामुळे आपले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आपण ‘मेक इन इंडिया’वर भर दिला पाहिजे. आपल्याकडे केमिकल, बायोलॉजिकल शस्त्रे होती, परंतु आपण ती नष्ट केली. हवाईदल, भूदल आणि नौदल यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे आणि याची प्रचीती कारगील युद्धात आली. आपत्कालीन व्यवस्थापनेत तिन्ही दल हे तत्पर सेवा देत आहेत. माध्यमांनीदेखील स्वत:च लक्ष्मणरेखा आखल्या पाहिजे. नकारात्मक बातम्या पसरवू नये. मुंबई हल्ल्यात याचा अनुभव आला होता, असेही ते म्हणाले. आपल्याला कोणत्याही देशाच्या धमकीला घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाने सैनिकासारखे सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. कमांडर सुबोध पुरोहित म्हणाले, नौदलाबद्दल फार कमी माहिती असते. आपला मुख्य व्यापार हा समुद्रमार्गाने होत असतो. नौदल हे दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध चांगले टिकवू शकते. नौदलाचे कार्यक्षेत्र फार मोठे आहे, हे सांगताना त्यांनी या सेवेच्या मुख्य शाखांची माहिती दिली. इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश, म्यानमार, थायलंड या पाच देशांशी आपले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानचे नौदल हे आपल्यापेक्षा छोटे आहे. सागरीमार्गाने पाकिस्तानसोबत आपली लढाई झाली, तर आपण नक्की जिंकू. (प्रतिनिधी)