शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

झळा ज्या लागल्या जीवा , पारा ४५ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:04 IST

राजस्थानातून आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या परिणामी सोमवारी ठाणे जिल्ह्यात तापमानाने कहर केला

ठाणे : राजस्थानातून आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या परिणामी सोमवारी ठाणे जिल्ह्यात तापमानाने कहर केला. बहुतांश शहरांचे तापमान ४४ ते ४५ अंशांदरम्यान गेल्याने अंगाची काहिली झाली. दुपारच्या वेळी रहदारीही थंडावली. उष्णतेची ही लाट मंगळवारीही कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.उष्ण वाऱ्यांच्या झळांमुळे रविवारपासूनच ठाणे जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली होती. ते ४२ ते ४४ अंशांदरम्यान होते. सोमवारी मात्र पारा आणखी चढत गेला आणि जिल्ह्यातील प्रमुख शहरांचे तापमान ४४ ते ४५ अंशांपर्यंत पोचले. तापमान वाढत गेल्याने सकाळी ११ ते साडेअकरानंतर उष्म्याच्या लाटा जाणवू लागल्या. लोकलमध्ये, बस किंवा रिक्षेसारख्या वाहनांत येणाºया झळांनी जीव नकोसा झाला. रहदारी मंदावली. दुकानांतील गर्दी रोडावली. काही दुकाने तर दुपारच्या वेळेत बंदही करण्यात आली. वातानुकूलन यंत्रांचाही फारसा उपयोग होत नसल्याचे जाणवत होते.सतत कोरड पडत असल्याने बाटलीबंद थंड पाण्याची मागणी प्रचंड वाढली. वेगवेगळ््या रेल्वे स्थानकांत मिळणाºया शुद्ध पाण्याच्या काऊंटरसमोर अक्षरश: रांगा लागल्या. ताक, सरबते, पन्हे, ऊसाचा रस पिण्यासाठी गर्दी झाली. कुल्फी, आइस्क्रिम, फालुदा, पियुष, लस्सी पिणाºयांचे प्रमाण वाढले. वेगवेगळ््या रूग्णालयांनी, पालिकांच्या आपत्कालीन विभागांनी उषण्तेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केले आहेत.घटलेली झाडे कारणीभूतकमी झालेले झाडांचे प्रमाण, घटलेले हरीत पट्टे, ठिकठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक, काँक्रिटचे रस्ते, सर्वत्र सुरू असलेली बांधकामे, जलाशयांचे घटलेले प्रमाण यामुळे तापमानाच्या झळा आणखी जाणवत असल्याचे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान उन्हात फिरू नका.आवश्यकता नसली, तरी भरपूर पाणी प्या.सरबते, शहाळ््याचे पाणी, निरा, ताक, पन्हे, ऊसाचा रस यासारखी शक्यतो नैसर्गिक पेय प्या.टोपी, रूमालाने डोके झाकून घ्या. गॉगल वापराचेहरा पुसण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा.कलिंगडासारखी रसदार फळे, काकडी यांचे सेवन करा.सौम्य रंगाचे, सैल, सुती कपडे वापरा.उन्हामुळे अस्वस्थ वाटू लागल्यास लगेचच सावलीत जा.फारच अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.पशु-पक्ष्यांसाठीही पुरेसे पाणी ठेवा.उष्ण वारे अंगावर येत असतील, तर त्यापासूनही काळजी घ्या.