शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

पाेलिसाने वाचवले आजीबाईंचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:23 IST

ठाणे पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकट्यादुकट्या राहणाऱ्या वयोवृद्धांची काळजी घेण्याबरोबरच त्यांना काय हवे नको, याची काळजी घेण्याच्या सूचना  पाेलीस ठाण्यांना दिल्यात.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील वयोवृद्ध नागरिकांची  योग्य काळजी घेण्याचे काम ठाणे शहर पोलीस चोख करीत आहे. त्याची प्रचीती नुकत्याच एका घटनेवरून आली. ठाण्यातील७० वर्षीय आजीबाईं काेकणातील गावी गेल्या हाेत्या. तेथे त्या तोल जाऊन पडल्या. त्यांनी थेट  कोपरी पोलीस ठाण्याचे संजीवन राणे यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी राणे यांनी तेथील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून ठाणे येथे पाठवण्यास सांगितले. त्या आल्यावर ठाण्यात एका खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करून प्राण वाचले.

ठाणे पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकट्यादुकट्या राहणाऱ्या वयोवृद्धांची काळजी घेण्याबरोबरच त्यांना काय हवे नको, याची काळजी घेण्याच्या सूचना  पाेलीस ठाण्यांना दिल्यात. त्यामुळे  पोलिसांशी त्यांचे आपुलकीचे नाते तयार झाले आहे. याच आपुलकीतून राणे यांनी ही कामगिरी केली.  प्रतिभा पालव (७०) या सिंधुदुर्गला गावी गेल्या होत्या. त्यांना पुन्हा ठाण्यात यायचे असल्याने त्या तिकीट काढण्यासाठी तिकीट बुकिंग केंद्रावर गेल्या होत्या. तेथून त्यांनी राणे यांच्याशी संपर्क साधून कोरोनाची स्थिती जाणून घेतली. याचदरम्यान त्यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्यात त्यांच्या मांडीचे हाड तुटले. त्यावेळी तेथील स्थानिक डॉक्टरांकडे गेले असता, रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. तसेच सहा महिने आरामही करावा लागेल, असे सांगितले. त्यावेळी त्यांनी नातेवाइकांना संपर्क न साधता थेट राणे यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. तेव्हा राणे यांनीही  वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसोझा यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यानंतर, राणे यांनी सिंधुदुर्ग येथील डॉक्टरांशी व त्यांच्या पुतण्याशी संपर्क साधून त्यांना रुग्णवाहिकेद्वारे ठाण्यात आणण्यास सांगितले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर, त्यांच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. राणे यांनी केलेल्या कार्याचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

टॅग्स :thaneठाणे