शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरीने तयार केली ऑक्सिजननिर्मिती मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 00:38 IST

दिवसाला तयार होणार ४८ हजार लिटर ऑक्सिजन

अंबरनाथ : देशाच्या सैन्यासाठी शस्त्रे आणि इतर सामग्री तयार करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीने हवेतून ऑक्सिजन वेगळा करणारे मशीन तयार केले आहे. फॅक्टरीच्या एमटीपीएफ कंपनीतील कामगारांनी हे मशीन तयार केले आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरीत सैन्यासाठी दारूगोळा तयार केला जातो, तर याच फॅक्टरीच्या एमटीपीएफ कारखान्यात सैन्य आणि नौदलासाठी लागणाऱ्या वाहनांचे पार्टस  तसेच इतर अनेक संरक्षणात्मक सामग्री तयार केली जाते. देशातील सर्वांत चांगले अभियंते आणि तंत्रज्ञ येथे मेहनत घेत असतात. याच कारखान्याने आता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केली आहे. मागील वर्षी व्हेंटिलेटरचा तुटवडा असताना या कारखान्याने व्हेंटिलेटर आणि सॅनिटायझरचीही निर्मिती केली होती, तर यावर्षी ऑक्सिजन निर्मिती करणारी मशीन तयार केली आहे. या कारखान्यात नायट्रोजन गॅस तयार करणाऱ्या दोन मशीन यापूर्वी कार्यरत होत्या. त्यापैकीच एका मशीनमध्ये बदल करून हे ऑक्सिजन मशीन तयार करण्यात आले आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात काही दिवसात एक कोविड रुग्णालय सुरू होणार असून त्यात हे मशीन बसविले जाणार आहे. ऑक्सिजन निर्मिती करून थेट रुग्णांपर्यंत हा ऑक्सिजन पोहोचविला जाईल. याद्वारे दिवसाला ४८ हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाणार आहे.

ऑक्सिजनची गरज पाहता कंपनीतील यंत्रसामग्रीचा वापर करून ऑक्सिजन निर्मिती करणारे मशीन तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर कोरोना रुग्णांवर करता येणार आहे.     - राजीव कुमार,  सरव्यवस्थापक, एमटीपीएफ, अंबरनाथ

 

टॅग्स :thaneठाणेOxygen Cylinderऑक्सिजन