शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भर पावसात अग्निशमन दलाने वाचविले १०३ जणांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 06:05 IST

मंगळवारी ठाणेकरांना मुसळधार पावसाने गाठल्यानंतर घरी आणि रस्त्यावर अडकलेल्यांची एकच धावपळ उडाली.

ठाणे : मंगळवारी ठाणेकरांना मुसळधार पावसाने गाठल्यानंतर घरी आणि रस्त्यावर अडकलेल्यांची एकच धावपळ उडाली. अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे जीव मुठीत घेऊन अडकलेल्या १०३ रहिवाशांची अग्निशमन दलाच्या वेगवेगळ्या केंद्रावरील जवानांनी प्राणांची बाजी लावून सुटका केली. आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांची त्यांना मोलाची मदत मिळाली.दुपारनंतर पावसाचा जोर वाढला त्याच वेळी भरतीची असल्याने खाडीतही पाणी जायला जागा नव्हती. त्यामुळे नाले, गटारे तुडूंब भरुन वाहू लागली होते. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पालिकेसह जिल्हा आपत्ती नियंत्रण यंत्रणांचीही एकच धावपळ उडाली. वर्तकनगर, भीमनगर, विनायक सोसायटी शिवाईनगर गार्डन बिल्डिंग, वर्तकनगर पोलीस वसाहत इमारत क्रमांक ५३ आणि कोपरीतील शामनगर तसेच नौपाड्यातील चिखलवाडी अशा इमारतींच्या परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. याशिवाय, वागळे इस्टेट टीसा हाऊस, ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधीनगर, कैलासनगर, सिद्धेश्वर तलाव, श्रीनगर या भागांसह ८३ ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या. तर जिल्हा रुग्णालयाजवळ एक बस पाण्यात अडकल्यामुळे २० प्रवासी जीव मुठीत घेऊन बसले होते. त्यांची कौशल्याने अग्निशमन दलाने सुटका केली. याशिवाय, मनोरमानगर येथे दोन, कोपरी परिसरातून २६, बाळकूम भागातील मानपाडा आणि मनोरमानगर भागातील ३० ते ३५ आणि नौपाड्याच्या चिखलवाडीतील ३० अशा सुमारे १०३ जणांची सुटका ठाणे महापालिकेच्या जवाहरबाग, कोपरी, वागळे इस्टेट, बाळकूम, पाचपाखाडी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. गेली २४ तास हा विभाग जीवाची पर्वा न करता नाले आणि इमारतींमधील पाण्यात शिरुन लोकांचे जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होता. आणखीही तीन ते चार जणांचा शोध लागलेला नसून त्यांचाही शोध घेण्याचे काम सुरु असल्याची माहिती अग्निशमन दलाचे उपमुख्य अधिकारी अरुण राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. नितिन कंपनी येथे कोरम मॉलजवळ दीपाली बनसोडे ही महिला पडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी अग्शिमन दल किंवा पोलिसांना तातडीने कळविले नाही. तिच्या पतीने दुसºया दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी अग्निशमन दलाला ही माहिती दिली. अन्यथा, तिचाही लवकर शोध लागू शकला असता, असेही ते म्हणाले.याठिकाणी भिंत कोसळली...पावसामुळे श्रीनगर सेक्टर चार प्रेरणा बिल्डिंगच्या कंपाउंडची भिंत, लोकमान्यनगरपाडा क्रमांक एक महिला बचत गट, देवदयानगर, आयप्पा मंदीर आदी सात ते आठ ठिकाणी भिंत कोसळल्याचे प्रकार घडले.ज्ञानेश्वरनगर, राजीव गांधीनगर, सिद्धेश्वर तलाव परिसरासह ३० ते ३५ ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. तर मुंब्रा येथील रेहमानिया हॉस्पिटल समोरील रोडवर दरड कोसळल्याची घटना घडली. या सर्व ठिकाणी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांनी धाव घेऊन मदत कार्य केले.