शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात ३ दिवसांत तब्बल २० हजार रुग्णांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2018 21:10 IST

सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा"च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिरात मंगळवार, १ मे रोजी, शिबिराच्या अखेरच्या दिवशी गर्दीचा जणू नवा विक्रम रचला गेला.

ठाणे : सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या पुढाकाराने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या "वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा"च्या वतीने आयोजित तीन दिवसांच्या महाआरोग्य शिबिरात मंगळवार, १ मे रोजी, शिबिराच्या अखेरच्या दिवशी गर्दीचा जणू नवा विक्रम रचला गेला. एकाच दिवसात तब्बल १० हजार गरजू रुग्णांनी तपासणी आणि उपचारांचा लाभ घेतला. तीन दिवसांत २० हजार रुग्णांची विनामूल्य तपासणी या शिबिरात करण्यात आली असून २ कोटी रुपयांच्या औषधांचे विनामूल्य वाटप देखील करण्यात आले.मा. ना. एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सदर शिबिराचा समारोप झाला. शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता अशा प्रकारच्या शिबिराची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. शिवसेना नेहमीच ठाणेकरांच्या गरजेला धावून गेली आहे, त्यामुळे अशा शिबिरांचे वरचे वर आयोजन केले जाईल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली. गेले तीन दिवस दिवस-रात्र रुग्ण सेवेत राबणारे डॉक्टर्स आणि निमवैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांचा विशेष गौरवपत्र देऊन श्री शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तब्बल ३५०हून अधिक डॉक्टर्स आणि तितकेच निमवैद्यकीय कर्मचारी अशा सुमारे ७०० जणांच्या पथकाने सर्वसाधारण तपासणीपासून हृदयरोग, कर्करोग, त्वचारोग, नेत्रतपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह अशा विविध आजारांची तपासणी करून औषधे दिली, तसेच गरजूंवर लवकरच ठाण्याच्या नामांकित रुग्णालयांमध्ये विनामूल्य अथवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. नेत्ररोग, हृदयरोग, कर्करोग, मेंदू रोग, अवयव प्रत्यारोपण, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, ग्रंथींचे विकार, जेनेटिक विकार, मूत्रविकार, मधुमेह, श्वसनाचे विकार, त्वचारोग, कान, नाक, घसा, प्लॅस्टिक सर्जरी, दंतरोग, लठ्ठपणा, हार्निया, अ‍ॅपेंडिक्स, आतड्याचे विकार, अस्थिव्यंगोपचार, बालहृदयविकार अशा सर्व प्रकारच्या आजारांवर येथे तपासणी व उपचार करण्यात आले. आयुर्वेदिक औषधोपचारासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. हृदयाला छिद्र असलेल्या बालकांची नोंदणी करण्यात आली असून त्यांच्यावर जून महिन्यात ठाणे येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मोफत 2ऊ इको तपासणी आणि निदान झालेल्या बालकांची मोफत/सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात येतील.ठाण्याच्या किसन नगर-२ येथील नेपच्यून एलिमेंट(जुने टाटा कन्सल्टन्सी कार्यालय), रोड नंबर २,वागळे इस्टेट येथे हे महा आरोग्य शिबीर पार पडले. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे - शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबर २०१७ पासून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम ठाणे (पूर्व) येथील कोपरीकार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. ठाणे  शहर आणि जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील गंभीर आजाराने ग्रस्त विविध गरजू रुग्णांनाशस्त्रक्रियासाठी आतापर्यंत या कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात तसेच रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यातयेते. गेल्या साडे पाच महिन्यांच्या कालावधीत सुमारे ५०० गरजू रुग्णांना अंदाजे तीन कोटी रुपयांपर्यंतची मदत या वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे