शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात साथीचे आजार नियंत्रणात, महापालिकेने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:23 IST

परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.

ठाणे : एकीकडे कोरोनाची साथ आटोक्यात येत असताना यंदा ठाणे शहरात विविध साथीच्या आजारांचे प्रमाणही नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले होते. परंतु, यंदा मात्र अद्यापही पावसाने साथ दिल्याने शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण नियंत्रणात असल्याची माहिती पालिकेने दिली.महापालिका हद्दीत जून-जुलै या कालावधीत डेंग्यूच्या २७ पैकी १० रुग्ण हे संशयित होते, तर मलेरियाचे दोन महिन्यांत २० रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरू झाला की, साथीचे आजारही बळावण्यास सुरुवात होते. यंदा आरोग्ययंत्रणाही कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याने शहरात इतर साथीच्या आजारांकडे दुर्लक्ष झाले आहे. असे असले तरी महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी विविध स्वरूपाचे उपाय केल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.>30,997 घरांचीतपासणीमहापालिका हद्दीत १८३० ठिकाणी औषधफवारणी केली आहे. तर, २९,६६३ ठिकाणी धूरफवारणी केल्याचा दावाही केला आहे. यशिवाय, ३० हजार ९९७ घरांची तपासणी केली असता १९९२ घरे दूषित आढळले आहेत. तसेच एकूण ४७,५२१ पाण्याच्या पिंपांच्या तपासणीत ११३८ पिंपे दूषित आढळल्याने त्यामध्ये अळीनाशक औषधफवारणी केली आहे.>तापाच्या रुग्णांवरही तपासणी करून कोरोनाचे उपचारमागील वर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर लेप्टो, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. दिव्यात तर लेप्टोमुळे काहींचा बळीही गेला होता. यंदा मात्र पावसाने तेवढे रौद्ररूप धारण केलेले नाही. यामुळे इतर साथीचे आजार नियंत्रणात असल्याचा दावा पालिकेने केला आहे. वास्तविक पाहता, सध्या कोरोनाच्या कामात सर्वच आरोग्य यंत्रणा व्यस्त असल्याने शहरातील इतर साथीच्या आजारांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचेही बोलले जात आहे. साधा ताप असला तरी रुग्णाला इतर रुग्णालयांत तपासले जात नाही. आधी कोरोनाचा अहवाल आणा, मगच उपचार करू,असे त्याला सांगितले जात आहे. त्यामुळे ताप असेल आणि कोरोनातपासणी केली तर अहवाल लगेच पॉझिटिव्ह येत असल्याचेही दिसत आहे. त्यामुळे संबंधित रुग्णावर थेट कोरोनाचेच उपचार केले जात आहेत. त्यामुळेदेखील इतर साथीच्या आजारांची संख्या ही कमी असल्याचे दिसत आहे.