शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, शासकीय पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 11:08 IST

bird flu in Palghar : पालघर शहरातील सुर्या कॉलनीमध्ये असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्री फॉर्ममध्ये गेल्या तीन दिवसात 50 कोंबड्यांचा अचानक तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पालघर : जिल्हा परिषदेच्या सधन कुक्कुट विकास गट, पालघर येथील शासकीय पोल्ट्री फार्ममधील सुमारे 50 कोंबड्यांचा गेल्या तीन दिवसांपासून संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर पुण्यात तपासणीसाठी पाठविलेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे निश्चित झाले आहे. 

प्रशासन सतर्क झाले आहे. हा बर्ड फ्लूचा प्रकार असावा, अशी शंका व्यक्त होत असून मृत पक्षाचे अवशेष तपासणीसाठी पुण्याच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. पालघर शहरातील सुर्या कॉलनीमध्ये असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्री फॉर्ममध्ये गेल्या तीन दिवसात 50 कोंबड्यांचा अचानक तडफडून  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

एकामागोमाग अचानक या कोंबड्याचा मृत्यू झाल्याने या पोल्ट्री फॉर्ममध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तो सील करण्यात आला आहे. या 50 कोंबड्या दगावल्याने पोल्ट्री फॉर्ममध्ये बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारत करीत पोल्ट्री फार्म सील करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या कोंबड्यांचे नमुने लॅबमध्ये पुणे येथे पाठविण्यात आल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त झाला असून कोंबड्यांचा झालेला मृत्यू हा बर्ड फ्लू मुळेच झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 

बर्डफ्लूचा शिरकाव झाल्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याने या रोगाला जिल्ह्यात अधिक पसरू न देता प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना आखित असल्याचे जिल्हा परिषद पशुधन अधिकारी डॉ. हिरवे यांनी 'लोकमत'ला सांगितले. 

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लूpalgharपालघर