शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांच्या विळख्यातून ११६ रुग्ण बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 04:40 IST

जिल्हा सामान्य रुग्णालय : समुपदेशनाच्या माध्यमातून उपचार

ठाणे : मादक पदार्थांच्या सेवनाच्या आहारी जाऊन मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या जिल्ह्यातील ११६ रुग्णांचे ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या वतीने मागील पाच महिन्यांत समुपदेशन करून त्यांना व्यसनापासून परावृत्त करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. याखेरीज, १६ जण आजही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती ‘जागतिक नो अल्कोहोलिक डे’च्या पार्श्वभूमीवर दिली आहे.

वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार दरवर्षी २५ दशलक्ष अल्कोहोलबाधित मृत्यू होत आहेत. त्यापैकी तीन लाख २० हजार जण हे १५ ते २९ या वयोगटांतील आहेत. त्यातही काहीजण हे व्यसनाच्या अधीन गेल्याचे दिसून आले आहे. अशा व्यसनामुळे मानसिक आजार जडलेल्या लोकांचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार विभागाच्या वतीने समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त करण्यात येते. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत आंतर व बाह्यरु ग्ण विभाग मिळून ३१४ रु ग्णांवर उपचार सुरू होते. यामध्ये बाह्यरु ग्ण विभागात २०८ जुने रु ग्ण आजही उपचारासाठी येत आहेत. तर, ५९ नवीन रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच ४७ रु ग्ण औषधोपचारासाठी रु ग्णालयात दाखल आहेत.एप्रिल ते आॅगस्ट २०१८ या पाच महिन्यांच्या कालावधीत आंतररु ग्ण व बाह्यरु ग्ण विभाग मिळून १३२ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. बाह्यरु ग्ण विभागात ११६ जुने रु ग्ण आजही रु ग्णालयात उपचारासाठी येत आहेत. यामध्ये २४ नवीन रु ग्णांची भर पडली, तर ९२ जुने रु ग्ण औषधोपचारासाठी रु ग्णालयात येत आहेत. त्यात सध्याच्या घडीला जिल्हा रु ग्णालयात १६ रु ग्ण उपचारार्थ दाखल असल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.रूग्णांवर औषधोपचारव्यसनाच्या आहारी जाऊन मानसिक आजार जडलेल्या रुग्णांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. दीक्षा रोहिला, मनोविकृती समाजसेवक श्रीरंग सिद, जिनी पटणी हे समुपदेशन करून योग्य औषधोपचारही करत आहेत.

टॅग्स :thaneठाणे