शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या मनसेच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:02 IST

आमच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला दिल्याने

सदानंद नाईकउल्हासनगर : आमच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला दिल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. याच वादाचे पर्यवसान पोस्टरयुद्धात झाले असून नवीन कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांसह शहराध्यक्षांचा फोटो पोस्टरवरून गायब झाला आहे. राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा आपल्या विठ्ठलास (बाळासाहेब ठाकरे) यांना बडव्यांनी घेरल्याची टीका केली होती. आज तीच टीका त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवर केली जात आहे.उल्हासनगरात मनसेची पायाभरणी अ‍ॅड. संभाजी पाटील यांच्यासह एल.बी. पाटील, बाळा गुंजाळ, शालिग्राम सोनावणे यांनी केली. पक्षाचा पहिला नगरसेवक शहरातून निवडून आला होता. पाटील यांच्या निधनानंतर मनसेला घरघर लागली. तरीही सचिन कदम, प्रदीप गोडसे, बंडू देशमुख, कल्पेश माने, मैनुद्दीन शेख, मनोज शेलार, कामगार नेते दिलीप थोरात आदी स्थानिक नेते व पदाधिकाºयांनी मनसेच्या कुडीत धुगधुग ठेवली होती. विरोधी पक्षाची भूमिका वठवत होते. मात्र, गेल्या महिन्यात शहराध्यक्षपदाच्या निवडीनंतर पक्षात असंतोष निर्माण झाला. बंडू देशमुख यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मनसेतील वाद उफाळून आले. राजू पाटील, काका मांडले यांच्यासह इतर जिल्हास्तरीय नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानांवर ही परिस्थिती घातल्यानंतर सचिन कदम यांची उल्हासनगर-अंबरनाथच्या शहरजिल्हाध्यक्षपदी तर प्रदीप गोडसे यांची उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. मात्र, काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. माजी शहराध्यक्ष बाळा गुंजाळ यांनी तर थेट आमच्या विठ्ठलासही बडव्यांनी घेरल्याची प्रतिक्रिया दिली. पक्षाचे माजी शहराध्यक्ष संजय घुगे, मैनुद्दीन शेख यांच्यासह अन्य काही जणांनीही नाराजी व्यक्त केली.राज यांनी पालघरमधील सभेपासून आपला राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. मात्र अनेक शहरांतील संघटनेकडे या अगोदर दुर्लक्ष झाल्याने असे नाराजीचे सूर उमटत आहेत.