शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचे मित्र म्हस्के आता महापालिकेत दिसणार नाहीत’, भाजपने लावलेला बॅनर चोवीस तासांत केला गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:57 IST

शहरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढलेले नसताना नेमका हाच बॅनर कोणी काढला, याची चर्चा सुरू झाली आहे. 

ठाणे : लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे नरेश म्हस्के विजयी झाल्यानंतर महापालिका मुख्यालयाजवळ ‘आमचे मित्र आता दिसणार नाहीत ठाणे महापालिकेत. ते आता बसणार थेट संसदेत. ठाण्याचा उंबरठा ओलांडण्यासाठी त्यांना शुभेच्छा’, असा बॅनर भाजप व मित्रपक्षांनी लावला. या बॅनरचा अर्थ म्हस्के आता ठाणे महापालिकेत लक्ष देऊ नका दिल्लीकडे लक्ष द्या, असा आहे. बुधवारी सायंकाळी लावण्यात आलेला हा बॅनर अवघ्या २४ तासांत काढण्यात आला. शहरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर काढलेले नसताना नेमका हाच बॅनर कोणी काढला, याची चर्चा सुरू झाली आहे. 

ठाण्याच्या विविध भागात म्हस्के यांना शुभेच्छा देणारे बॅनर झळकू लागले आहेत. खा. म्हस्के यांनी विजयानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांचे आभार मानले. त्यासाठी त्यांनी केलेल्या पोस्टचीही सर्वत्र चर्चा होत आहे. ‘एक चहावाला पंतप्रधान होतो, एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता ‘खासदार’ झाला. हा आहे नवा ‘हिंदुस्तान’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अतिसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली, असेही त्यांनी म्हटले.

राजन विचारे यांच्या बॅनरचीही चर्चा राजन विचारे यांचा चंदनवाडी शाखेजवळ एक बॅनर झळकला आहे, त्यात ‘गड आला पण सिंह गेला’ असे म्हटले आहे. या बॅनरचीही चर्चा सुरू आहे. परंतु महापालिका मुख्यालयाजवळ लागलेल्या बॅनरवरून वेगळ्याच चर्चांना उधाण आले. म्हस्के विजयी झाल्याबद्दल लावण्यात आलेल्या या बॅनरवर भाजप आणि शिंदेसेनेच्या माजी नगरसेवकांचे फोटो होते. लोकसभा निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हस्के यांना आता महापालिकेकडे नव्हे दिल्लीकडे लक्ष द्या, असा सल्ला दिला होता. 

टॅग्स :thaneठाणेnaresh mhaskeनरेश म्हस्के