शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल, आमदार जितेंद्र आव्हाडांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:00 IST

पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्र येण्याची गरज आहे. तर ठाणे महापालिकेने मोठे प्रकल्प आधी बाजूला सारून शाई धरणासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठळक मुद्देमहासभेत शाई धरणाची घोषणा करण्याची मागणीशाई धरणाचा खर्च १४०० कोटींवर

ठाणे - डिसेंबरमध्येच ठाणे शहरात पाण्याची समस्या भीषण झाली आहे. येत्या सहा महिन्यात ही परिस्थिती आणखी वाईट होणार आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या महासभेत लक्षवेधीला उत्तर देतांना शाई धरणावर शिक्कामोर्तब करा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. परंतु या बाबतचा निर्णय झाला नाही तर प्रत्येक महासभेला पाण्यासंदर्भात आंदोलन पेटले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.                         सध्या ठाण्यासह जिल्ह्यात पाण्याची समस्या भीषण रुप धारण करीत आहे. डिसेंबर महिन्यातच ३० टक्के पाणी कपात सुरु झाली आहे. ३० तासांसाठी पाणी गेल्यानंतर पुन्हा पाणी चढण्यासाठी २४ तासांचा कालावधी जातो. त्यामुळे एक दिवसाचे शटडाऊन घेतले जात असले तरी त्याचे परिणाम पुढील दोन ते दिवस नागरीकांना भेडसावत असल्याचेही त्यांनी सांगितले. घोडबंदर सारख्या भागातही पाण्याची समस्या वाढत आहे, परंतु असे असतांना न्यायालयात ठाणे महापालिकेने दोन अ‍ॅफीडेव्हीट सादर केले. त्यातही ते दिशाभुल करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पालिका प्रशासनाने न्यायालयाचीही दिशाभुल केली असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.                   मागील कित्येक वर्षापासून पाण्याची ही समस्या सोडविण्यासाठी शाई धरणाची मागणी करण्यात आली आहे. सुरवातीला याचा खर्च हा कमी होता. परंतु आता त्याचा खर्च सुमारे १४०० कोटींच्या घरात गेला आहे. असे असेल तरी वेळीच या धरणाचे काम सुरु केले असते तर आज ही परिस्थिती प्रशासनावर आली नसती असेही त्यांनी सांगितले. परंतु आता पाण्याची येत्या काळाची समस्या लक्षात घेता, धरण होणे ही काळाची गरज असून त्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनासुध्दा निवेदन दिले जाईल असेही त्यांनी सांगितले. क्लस्टर व्हावे यासाठी ज्या पध्दतीने सर्व पक्षीय एकत्र आले होते, तसेच आता शाई धरणासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.दुसरीकडे शाई धरण बांधण्यासाठी पालिकेने इतर मोठ्या प्रकल्पांचा निधी शाई धरणासाठी वर्ग करण्याची मागणीसुध्दा त्यांनी केली आहे. एकूणच येत्या महासभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना प्रशासन आणि महापौरांनी शाई धरणाची घोषणा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. परंतु ही घोषणा झाली नाही तर मात्र प्रत्येक महासभेत पाण्याचे आंदोलन पेटेल असा इशाराही त्यांनी शेवटी दिला. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस