शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा प्रजासत्ताकदिनी रजा आंदोलन अटळ : मागण्यांसाठी अग्निशमन कर्मचारी पुन्हा आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:28 IST

केडीएमसीतील अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या प्रलंबित हक्कांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी १ ते १५ जून या कालावधीत काळीफीत आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर, २६ जूनला रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामावर हजर न होता सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, अजूनही त्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाही, तर २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

कल्याण : केडीएमसीतील अग्निशमन दलाचे कर्मचारी त्यांच्या प्रलंबित हक्कांसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी १ ते १५ जून या कालावधीत काळीफीत आंदोलन छेडले होते. त्याचबरोबर, २६ जूनला रमजान ईदच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी कामावर हजर न होता सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. मात्र, अजूनही त्यांच्या मागण्यांसंदर्भात ठोस कार्यवाही न झाल्याने पुन्हा एकदा त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जर या मागण्या मान्य झाल्या नाही, तर २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.अग्निशमन विभागात नवीन भरती, जादा कामाचा मोबदला, सुटीच्या दिवशी जादा काम केल्याचा मोबदला अशा अग्निशमन कर्मचाºयांच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय कामगार सेना या संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचाºयांनी काळीफीत आंदोलन छेडले होते. याची दखल न घेतल्यास सार्वजनिक सुटीच्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मात्र, काळीफीत आंदोलनाची दखल न घेतल्याने ९० कर्मचाºयांनी सामूहिक रजेचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाला सादर केले. परंतु, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या मध्यस्थीने प्रशासन आणि संघटनेच्या पदाधिकाºयांची संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. या वेळी महासभेत यासंदर्भातील अहवाल सादर करून महिनाभरात मागण्यांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात ठोस कृती केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. यात कर्मचाºयांना मिळणारा विशेष वेतन जोखीमभत्ता फायरमन यांना ३८० रु. आणि लिडिंग फायरमन ते अधिकाºयांना दरमहा ४०० रुपये मिळेल, असे सांगितले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी मोबदला देण्याचे मान्य करण्यात आले होते.प्रजासत्ताकदिनी केवळ परेडमध्येच सहभागउल्लेखनीय कामगिरी करणाºयांना १५ आॅगस्टला दिलेले पुरस्कार वगळता उर्वरित एकही मागणी आजवर पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संघटना आक्रमक झाली आहे. महासभेत देखील या मागण्यांना बगल देण्यात आली. जानेवारी महिन्याच्या महासभेत जर उचित कार्यवाही झाली नाही, तर आंदोलन अटळ असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. केवळ पुरस्कार देऊन बोळवण केली असली, तरी आता माघार नाही. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. या वेळी कर्मचारी परेडमध्ये सहभागी होतील. पण, त्यानंतर एकही कॉल स्वीकारला जाणार नाही, अशी माहिती संघटनेचे कल्याण युनिटचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी दिली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका