शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा दंडात्मक कारवाई, पालिकेचे ठाणेकरांना आवाहन : मालमत्तांमध्ये केलेले बदल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:35 IST

मालमत्ताकराची वसुली वाढावी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्तांमध्ये केलेले बदल, वाढीव बांधकामांची माहिती स्वत:हून पालिकेकडे सादर करण्याचे आवाहन पालिकेच्या मालमत्ताकर विभागानेकेले आहे.

ठाणे : मालमत्ताकराची वसुली वाढावी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्तांमध्ये केलेले बदल, वाढीव बांधकामांची माहिती स्वत:हून पालिकेकडे सादर करण्याचे आवाहन पालिकेच्या मालमत्ताकर विभागानेकेले आहे. ते सादर न केल्यास पालिकेच्या सर्व्हेक्षणात मालमत्तांमध्ये काही बदल आढळल्यास मालमत्ताकराच्या दुप्पट दंड किंवा व्याज आकारण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.महापालिकेने मागील काही वर्षात मालमत्ताकरात वाढ करण्यासाठी विविध स्वरुपाचे उपाय केले आहेत. त्यानुसार मालमत्ताकरात काही प्रमाणात का होईना वाढ झालेली आहे. तसेच पाणीकराच्या वसुलीसाठीदेखील उपाय योजले जात आहेत. तसेच या दोन्ही करात मागील दोन वर्षात वाढदेखील केली आहे. परंतु, त्यांची वसुली सदोष पद्धतीने होत होती. ५०० चौरस फुटांवरील घरांची पाणी बिले क्षेत्रफळानुसार देण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेऊनही त्याची अंमलबजावणी पालिकेला करता आलेली नाही. त्यातील दोष दूर करून यंदा त्या पद्धतीने बिले पाठवली आहेत.दरम्यान त्याच धर्तीवर आता मालमत्ताकरवसुली पारदर्शक करण्याचा पालिकेचा मानस आहे. पालिकेच्या रेकॉर्डवर मालमत्तांच्या जशा नोंदी आहेत, त्यानुसार त्यांना बिले पाठविली जात आहेत. २०११-१२ साली पालिकेने त्यासाठी एक सर्वेक्षण केले होते. त्याचा आधार यासाठी घेतला जात आहे. मात्र, या नोंदी आणि प्रत्यक्षातील मालमत्तांचा आकार यात प्रचंड तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक मालमत्ताधारकांनी आपल्या घरांमध्ये अंतर्गत बदल करून क्षेत्रफळ वाढविले आहे. अनेकांनी निवासी जागेचा वापर व्यावसायीक कामांसाठी सुरू केला आहे. काही जणांनी मालमत्तांची पुनर्बांधणी केली आहे किंवा ती भाड्याने दिलेली आहे. मालमत्ताकरात सुधारणा किंवा बदल करण्यासाठी त्याबाबतची माहिती पालिकेला देणे गरजेचे असते. मात्र, बहुसंख्य मालमत्ताधारकांनी ती दिलेली नाही. त्यामुळे याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वत: मालमत्तासंदर्भात माहिती पालिकेला द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे. पुढील सात दिवसांत मालमत्तांमध्ये केलेल्या बदलांची माहिती पालिकेच्या स्थानिक प्रभाग कार्यालयांमध्ये किंवा dmctax@thanecity.gov.in या इमेल आयडीवर सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी जो अर्ज करावा लागणार आहे त्याचा नमुना www.thanecity.gov.in या बेवसाईटवर उपलब्ध आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका