शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, राष्ट्रवादीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:04 IST

ठाणे-कळवेकरांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तांनी या पुलाचे काम तत्काळ पूर्ण करुन घ्यावे, अन्यथा, कळवेकरांचा उद्रेक होईल, आणि संबधीत ठेकेदार आणि पालिका अधिकारांना जनताच काळे फासेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी दिला.

ठळक मुद्देवाहतुक कोंडीमुळे कळवेकर हैराणठेकेदार नव्याने निवडण्याची मागणी

ठाणे - कळवा, विटावाकरांची वाहतुक कोंडीतून सुटका व्हावी म्हणून कळवा खाडीवर तिसरा पुल उभारण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु हे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असतांनाही आजही याचे काम रखडलेले आहे. त्यात ज्या ठेकेदारांना हे काम देण्यात आले आहे, त्यांना मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता शिल्लक राहिलेले काम संबधींत ठेकेदाराकडून काढून घ्यावे आणि या कामासाठी दुसरा ठेकेदार नियुक्त करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे. तसेच हा नवा केव्हा खुला होणार याची माहिती पालिकेने द्यावी अन्यथा ठेकेदाराला आणि त्याला पाठीशा घालणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना वेळ पडल्यास काळे फासले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

          ठाण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने ठाणेकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. केवळ घोडबंदरच नव्हे तर कळवा उड्डाणपुलावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. कळवा येथील ब्रिटिशकालीन पूल बंद केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या एकाच उड्डाणपुलावर सध्या वाहतुकीचा भार सुरु आहे. त्यामुळे या पुलावर रोजच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी गेल्या चार वर्षापूर्वी या उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंत कळवा उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईल असा दावा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र २०१४ साली उड्डाणपुलाच्या कामासाठी वर्क आॅर्डर देण्यात आली असल्याची माहिती मिलिंद पाटील यांनी यावेळी दिली. सुमारे १८३ कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून वर्क आॅडर दिल्यापासून तीन वर्षात हे काम पूर्ण होणार होते. मात्र दिलेल्या मुदतीमध्ये हे काम पूर्ण झाले नसून कामाच्या दर्जाबाबत देखील आनंद परांजपे आणि मिलींद पाटील आणि सुहास देसाई यांनी प्रश्न उपस्थित केला आहे .         सुप्रीम या कंपनीचा एमएमआरडीएने कल्याण येथील उड्डाणपुलाचे काम काढून घेतले असून जे कुमार मुंबईमध्ये काळ्या यादीमध्ये आहे. या दोघांनीही कळवा उड्डाणपुलाचे काम वेळेत न केल्याने प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असून हे काम दुसºया ठेकेदारांना देण्यात यावे अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसtmcठाणे महापालिका