शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा सोमवार पासून हॉटेल आणि पार्सल सेवा बेमुदत बंद; हॉटेल व्यावसायिकांचा राज्य सरकाराला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 18:27 IST

ठाण्यासह जिल्ह्यात र्निबध शिथील झाले असले तरी देखील हॉटेल व्यावसायिकांना यात सुट देण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे  : ठाण्यासह जिल्ह्यात र्निबध शिथील झाले असले तरी देखील हॉटेल व्यावसायिकांना यात सुट देण्यात आलेली नाही. त्यामुळे ठाण्यातील हॉटेल व्यावासायिकांना बुधवारी या विरोधात शांततेच्या मार्गाने आपआपल्या हॉटेलमध्ये आंदोलन केले. परंतु यावेळी जर रविवार र्पयत हॉटेल आणि रेस्टॉरेन्टची वेळ वाढवून दिली नाही तर सोमवार पासून सर्व हॉटेल बेमुदत बंद केली जातील तसेच पार्सल सेवाही बंद करु असा इशारा हॉटेल व्यावसायिकांनी दिला.राज्य शासनाने राज्यातील ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात कोरोना र्निबध शिथील केले आहेत. त्याची अंमलबजावणी ठाणो जिल्ह्यात मंगळवार पासून सुरु झाली आहे. परंतु हे र्निबध शिथील करीत असतांना मॉल,मल्टीप्लेक्स आणि हॉटेल व्यावसायिकांवर अन्याय करण्यात आला आहे. दुकानांसाठी रात्री १० वाजेर्पयतची वेळ देण्यात आली आहे. परंतु हॉटेल व्यावसायिकांसाठी चार वाजेर्पयतचीच वेळ निश्चित करण्यात आली असून ५० टक्के क्षमतेची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील तब्बल ७१५ हॉटेल चालकांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी बुधवारी या निर्णयाच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन केले.

ठाणे महापालिकेने देखील आद्यादेश काढून काय सुरु राहणार काय बंद राहणार याची माहिती दिली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या कालावधीत शहरातील हॉटेल, बार हे सांयकाळी चार वाजेर्पयत 5क् टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. त्यानंतर चार नंतर पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच रविवारी हॉटेल पूर्णपणो बंद राहणार आहेत. यादिवशी पार्सलची सुविधा मात्र सुरु राहणार आहे. पुन्हा र्निबध कठोर करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रत्येक छोटय़ा मोठय़ा हॉटेल, बारमध्ये २० पासून ते ७० कर्मचारी कामाला आहेत. त्यात दुसरी लाट ओसरल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गावावरुन कामासाठी आणण्यात आले आहेत.

र्निबध शिथील होत असल्याने त्याचा फायदा आम्हालाही होईल या आशाने गावावरुन कामगारांना बोलवण्यात आल्याने त्यांचा पगार, लाईट बील, टॅक्स, जीएसटी आदींसह इतर खर्च हा करावाच लागणार असल्याचे हॉटेल व्यावसियांकाचे म्हणने आहे. इतर व्यवसायांना सवलत देण्यात आली आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांचे धंदाच दुपार नंतर सुरु होत असतो. त्यामुळे राज्य शासनाने आम्हाला किमान दुपार नंतर रात्री १० र्पयत हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. किंवा सांयकाळी ६ ते रात्री १२ वाजेर्पयत परवानगी द्यावी अशी मागणीही केली आहे. त्यामुळे रविवार र्पयत आम्ही वाट बघणार आहोत, परंतु तो र्पयत निर्णय आला नाही तर सोमवार पासून हॉटेल पूर्णपणो बेमुदत बंद ठेवली जातील, तसेच पार्सलची सेवाही बंद असेल असा इशाराही हॉटेल व्यावसायिकांनी दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेhotelहॉटेल