शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

इतर भाषिकांचे त्यांच्या भाषेवर प्रेम, आपणही आपल्या मराठीसाठी हट्ट केला पाहिजे - राज ठाकरे

By अजित मांडके | Updated: February 27, 2024 21:40 IST

ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते.

ठाणे : इतर भाषिक हे आपल्या भाषेवर प्रेम करतात मग आपण आपल्या मराठी भाषेसाठी का हट्ट करू नये असा सवाल मनसेचे आद्यक्ष राज ठाकरे यांनी केला. आपल्या भाषेवर इतके संस्कार झाले असताना आपणच आपल्या भाषेपासून दूर जात आहोत, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ठाण्यात मनसेच्या वतीने मराठी भाषा दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली. निवडणूक तोंडवर आहे, तेव्हा असे कार्यक्रम ऐकायला मिळणार नाहीत तेव्हा आमचीच पकपक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. यापूर्वी मराठी भाषा दिन केवळ तारखे पर्यंत मर्यादित होता. मनसेने २००७ मध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यास सुरवात केली आणि आता सर्वच जण हा दिन साजरा करीत आहेत. मात्र मराठी भाषा दिन केवळ एका दिवसापूर्त न राहता वर्षाचे ३६५ दिवस हा दिवस साजरा झाला पाहिजे असेही ते म्हणाले.  इतर राज्यात आशा पद्धतीत दिवस साजरा करत असेल असे कुठे दिसत नाही,  आपल्या राज्याला एक भूगोल आणि इतिहास आहे इथे अनेक संत, कवी होऊन गेले आहेत, त्यामुळे मराठी भाषेला एक वेगळा दर्जा आहे. इतर भाषेतील अनेक चित्रपट तेलगू, इतर  भाषेत डब होतात मात्र मराठी भाषेत काही ठराविक चित्रपट डब होत आहेत पण मराठीत डब झालेले चित्रपट मी आवर्जून बघतो आपणच मराठीवर प्रेम करायला हवे असेही ते म्हणाले.

रवींद्रनाथ टागोर यांनी अनेक साहित्य लिहिले मात्र त्यांनी ते बंगाली भाषेत लिहिले त्यांना मॅगेसेस पुरस्कार मिळाला, सत्यजित रे याना अमेरिकेने ऑस्कर पुरस्कार दिला, त्यांनी आपली भाषा कधी सोडली नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मराठी भाषेत अनेक चित्रपट येत आहेत मात्र त्यात बदल होणे गरजेचे आहे नाटक आणि मराठी चित्रपटानी कात टाकणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले. एकूणच आपण मराठी साठी हट्ट धरला पाहिजे, इतर भाषिक आपल्या भाषेसाठी हट्ट धरतात आणि आपण आपल्याच भाषेपासून दूर जात आहोत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मनसे मराठी भाषेसाठी एक शपथ घेऊन येणार आहे यात मराठी माणसाने मराठी भाषेसाठी काय केले पाहिजे यात असणार आहे, मराठी भाषा दिवस ३६५ दिवस साजरा करूया, मातृभाषा टिकवूया यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मराठी मान्यवरांचा सत्कार यावेळी राज यांच्या हस्ते करण्यात आला.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिन