शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन; स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या 41 गृहनिर्माण संस्था, 15 शाळांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 18:18 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत गांधी जयंतीच्या निमित्ताने सोमवारी शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालिकेने स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या तारांकित मानांकनानुसार एकूण ४१ गृहनिर्माण संस्थांसह १५ शाळांची निवड करण्यात आली.

राजू काळे भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत गांधी जयंतीच्या निमित्ताने सोमवारी शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालिकेने स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या तारांकित मानांकनानुसार एकूण ४१ गृहनिर्माण संस्थांसह १५ शाळांची निवड करण्यात आली. त्यांना महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

स्वच्छता रॅलीला नवघर येथील मैदानातून सकाळी ९ वाजता सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी महात्मा गांधींच्या प्रतिमेला महापौरांनी पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर आयुक्तांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. रॅलीला पालिकेच्या सहा प्रभागांतर्गत सुरुवात करण्यात आली. त्यात नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगटाचे सदस्य, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तसेच पालिकेतील बहुतांशी अधिकारी व कर्मचा-यांनी रॅलीत सहभाग घेऊन त्याचे नियोजन केले. रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येऊन ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यासह ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे तसेच उघड्यावर शौचाला न बसणे व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी दर आठवड्यातून २ तास तर वर्षभरात १०० तास श्रमदान करण्याचा संकल्प केला. २ आॅक्टोबर २०१४ मध्ये सुरु झालेल्या स्वच्छता अभियानाला यंदा तीन वर्षे पूर्ण होत असून शहरातील स्वच्छतेसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे आयुक्तांनी उपस्थितांना याप्रसंगी सांगितले. त्यासाठी नागरीकांनी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी कुठेही अस्वच्छता आढळल्यास नागरिकांनी उपलब्ध मोबाईल अ‍ॅपवर माहिती द्यावी अथवा थेट पालिकेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन केले. रॅलीत नगरसेवक, नगरसेविकांसह सभागृह नेता रोहिदास पाटील, पालिका उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, दीपक पुजारी, डॉ. संभाजी पानपट्टे, मुख्य लेखाधिकारी शरद बेलवटे, सहाय्यक लेखाधिकारी सुरेश घोलप, शिक्षणाधिकारी  सुरेश देशमुख आदींनी सहभाग घेतला होता.