शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

महापौर निधीच्या नावाखाली कपात: कामगारांची १० लाखांची रक्कम परत करण्याचे ठाणे औद्योगिक न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:11 IST

कर्मचा-यांची संमती न घेता प्रशासनाने परस्पर या रकमेतून प्रत्येकी २०० रुपये कपात केली. पाच हजार १८५ कामगारांची १० लाख ३७ हजारांची रक्कम परत करण्याचे आदेश ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत.

ठळक मुद्देसुमारे आठ वर्षे चाललेल्या लढ्याला यशपाच हजार १८५ कामगारांना होणार फायदाप्रशासनाला चपराक - रवी राव

ठाणे : महापौर निधीच्या नावाखाली सानुग्रह अनुदानातून कपात केलेली रक्कम ठाणे महापालिका कर्मचा-यांना परत करण्याचे आदेश ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. औद्योगिक न्यायालयाचे सदस्य एस.जी. दबडगावकर यांनी हा निर्णय नुकताच दिला आहे.ठाणे महापालिका कर्मचा-यांना २०१० मध्ये म्युनिसिपल लेबर युनियनच्या प्रयत्नाने प्रत्येकी १० हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले होते. परंतु, कर्मचा-यांची कोणत्याही प्रकारे संमती न घेता प्रशासनाने परस्पर या रकमेतून प्रत्येकी २०० रुपये कपात केली. प्रशासनाच्या या बेकायदेशीर कृतीविरुद्ध म्युनिसिपल लेबर युनियनने ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयात ठाणे महापालिका आणि पालिका आयुक्त यांच्याविरुद्ध हा दावा दाखल केला होता. न्या. दबडगावकर यांच्याकडे या खटल्याची अंतिम सुनावणी होऊन ठामपा प्रशासनाने कामगार अनुचित प्रथेचा अवलंब केल्याचे नमूद करून महापौर निधीच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या कापलेली सानुग्रह अनुदानाची रक्कम १० लाख ३७ हजार रुपये कामगारांना प्रत्येकी २०० याप्रमाणे परत करण्याचे आदेश न्यायालयाने ५ मार्च २०१८ रोजी दिले आहेत. पाच हजार १८५ कामगारांची ही रक्कम न्यायालयाच्या आदेशापासून तीन महिन्यांमध्ये त्यांना परत करण्याचे सूचित केले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारे महापौर निधी कपात न करण्याचे निर्देशही दिले आहेत. सुमारे आठ वर्षे चाललेल्या या लढ्याला यश आल्याबद्दल कामगार नेते रवी राव यांनी समाधान व्यक्त केले आहे. कामगार अनुचित प्रथेचा अवलंब करणा-या प्रशासनाला ही चपराक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे कामगार कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून न्यायालयात कामगार संघटनेची प्रभावीपणे बाजू मांडणा-या अ‍ॅड. रवींद्र नायर यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालयThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका