शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील तीन निरीक्षकांसह ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 00:18 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३५ निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखी तीन निरीक्षकांसह तब्बल ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी काढले आहेत.

ठळक मुद्दे२७ सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चार दिवसांपूर्वी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३५ निरीक्षकांच्या बदल्या केल्यानंतर आता आणखी तीन निरीक्षकांसह तब्बल ३० पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांनी काढले आहेत. यामध्ये २७ सहायक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याही गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या. मंगळवारी रात्री उशिरा काढलेल्या या आदेशात विष्णुनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांची मानपाडा, बाजारपेठचे दिलीप फुलपगारे यांची कोपरी पोलीस ठाण्यात तर खडकपाडा पोलीस ठाण्याचे अंकुश बांगर यांची ठाण्याच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागात बदली झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक तथा पोलीस आयुक्तांचे वाचक (रिडर) अजय घोसाळकर यांची गुन्हे शाखेतून कासारवडवली तर मिलिन पिंगळे यांची डायघर, कापूरबावडीचे अशोक वाघ यांची चितळसर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. याशिवाय, भिवंडीचे जमिरोद्दीन शेख (निजामपुरा), कापूरबावडीचे बाळू वंजारे (मानपाडा), कासारवडवलीचे सचिन बेंद्रे (कापूरबावडी) कोनगावचे भाऊसाहेब पवार यांची मध्यवर्ती तर नितीन सूर्यवंशी यांची शांतीनगर पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे मंगेश बोरसे यांची चितळसर, मंगेश शिंदे यांची वाहतूक शाखा आणि हणमंत क्षिरसागर यांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात तसेच वर्तकनगरचे ज्ञानेश्वर आव्हाड यांची श्रीनगर तर सुहास हटेकर यांची नौपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. नौपाडयाचे प्रशांत आवारे यांची श्रीनगर, वागळे इस्टेटचे अमोल मोरे यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे रामदास शेंडगे आणि मानपाडयाचे मारुती आंधळे यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. मानपाडयाचे दिलीप जाधव यांची कल्याण नियंत्रण कक्ष आणि बाजारपेठचे अविनाश बनवे यांची मानपाडा पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसTransferबदली