शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

वादग्रस्त ‘बीएसयूपी’च्या चौकशीचे आदेश; १० वर्षांपासून योजना रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:37 IST

पहिल्या टप्प्यात केवळ १७९ जणांनाच घरे मिळाली आहेत.

मीरा राेड :  गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या काशिमीरा भागातील वादग्रस्त बीएसयूपी योजनेची चौकशी करण्याचा आदेश राज्य सरकार शासनाने दिला आहे.

महापालिकेने २००९ मध्ये काशिचर्च झोपडपट्टीमधील ४७१ आणि जनतानगर झोपडपट्टीतील चार हजार १३६ झोपडपट्टीधारकांना इमारतींमध्ये पक्की घरे देण्याचा ठराव केला होता. त्यावेळी खर्चाच्या ५० टक्के रक्कम केंद्र सरकार, ३० टक्के राज्य सरकार व ११ टक्के लाभार्थी आणि नऊ टक्के महापालिकेने खर्च करायचा होता. त्यातील दोन हजार १६० घरे पाडून त्यातील रहिवाशांना पालिकेने संक्रमण शिबिरात पाठवले. परंतु, पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे योजना बारगळली.

पहिल्या टप्प्यात केवळ १७९ जणांनाच घरे मिळाली आहेत. तर, १०२१ सदनिकांच्या चार इमारतींची कामे अजून सुरू असून यातील २९४ सदनिका डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. पालिकेने योजना पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडून १५० कोटींचे कर्ज मागितले असून त्यातील ४० कोटी पालिकेस वर्ग झाले आहेत. बांधकामासाठी पालिकेने निविदा मागवली. ११८ कोटी १६ लाख ५७ हजार रुपयांच्या तीन इमारतींतून ९६० झोपडपट्टीवासीयांना दोन वर्षांत घरे मिळणार होती.

निविदा मंजुरीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १६ मार्चच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव दिला होता. तिन्ही इमारतींची कामे मे. शायोना कॉर्पोरेशनला देण्याची प्रशासनाची शिफारस असताना सत्ताधारी भाजपने ही निविदा फेटाळत कंत्राटदारास काळ्या यादीत टाकून नव्या निविदेचा निर्णय भाजपने घेतला होता. या प्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रारी करून योजनेत घोटाळा झाल्याची तक्रार केली.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक