शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उकडीच्या पाच लाख मोदकांची आॅर्डर, गुरूवार रात्रीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:48 IST

बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणून ओळखला जाणारा उकडीचा मोदक यंदा ठाण्यातील गणेशभक्त भरभरुन खरेदी करणार आहेत. गेल्या आठवड्यापासूनच मोदकाच्या आॅर्डर्स नोंदवल्या गेल्या असून अजूनही बुकींग सुरूच आहे.

ठाणे : बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणून ओळखला जाणारा उकडीचा मोदक यंदा ठाण्यातील गणेशभक्त भरभरुन खरेदी करणार आहेत. गेल्या आठवड्यापासूनच मोदकाच्या आॅर्डर्स नोंदवल्या गेल्या असून अजूनही बुकींग सुरूच आहे. गणशोत्सवात दहा दिवसात चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण ठाण्यात तब्बल पाच लाख उकडीच्या मोदकांची खरेदी होईल, असे उपहारगृहे, घरगुती वस्तुंचे पुरवठादार आणि बचत गटातील महिलांनी सांगितले.मोदकाचा आकार, दर्जा यानुसार त्याची किंमत ठरते. दरवर्षी वाढणारी महागाई, कराच्या रचनेतील बदल आणि मजुरी यामुळे यंदा मोठ्या आकाराच्या एका मोदकाची किंमत २५ रुपयांवर गेली आहे.श्री गणरायाचे आगमन दोन दिवसांवर आले आहे. यात नैवेद्य म्हणून उकडीच्या मोदकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणपतीच्या नैवेद्यात ओला नारळ-गुळाच्या सारणाने गच्च भरलेला शुभ्र, गुबगुबीत मोदक, त्यावर तुपाची धार हा बेत हमखास असतो. आदल्या दिवसापासूनच मोदक बनविण्याची तयारी सुरू होते. ज्यांना घरी मोदक करणे शक्य नसते ते आॅर्डर देऊन तयार मोदक खरेदी करतात. उपहारगृहांपासून घरगुती आॅर्डर्स घेणारे, बचत गटांचे स्टॉल येथे त्याचे बुकिंग सुरू असते.आठवडाभरापासून मागण्या नोंदवून घेतल्या जात होत्या. अजूनही काही ठिकाणी त्या गेतल्या जात आहेत. पण अनेक दुकानांनी अंदाज घेत आता आॅर्डर्स घेणे थांबवलेही आहे. कोणी हजार मोदकांच्या आॅर्डर्स घेतल्या आहेत, तर कोणी पाच हजार मोदकांच्या.उत्सवाच्या पहिल्या दिवशी बहुतांश ठिकाणी मोदक उपलब्ध होतील. गणेश चतुर्थीला नैवेद्यासाठी मोठ्या प्रमाणात मोदकांची खरेदी होणार असल्याचे उपहारगृहाचे मालक संजय पुराणिक यांनी सांगितले; तर या दिवसापासून पुढे अनेत चतुर्दशीपर्यंत भक्तांसाठी मोदक उपलब्ध असतील, असे केदार जोशी म्हणाले. वाढत्या महागाईमुळे उकडीच्या मोदकांचे दरही वाढले आहेत. गेल्या वर्षी एक मोदक २२ रुपये दराने मिळत होता. परंतु यंदा त्याचे दर २५ रुपयांवर गेले आहेत. काही उपहारगृहांनी मात्र दर जैसे थे ठेवले आहे.महाराष्ट्रीयनथाळीतही समावेशज्या ठिकाणी महाराष्ट्रीयन थाळी मिळते, घरगुती जेवण मिळते त्या ठिकाणी गणेशोत्सवाच्या काळात जेवणात उकडीचे मोदक हमखास उपलब्ध करून दिले जातात. नेहमीच्या आॅर्डर पलिकडे हे मोदक असतात. त्यातही खास करून केळीच्या पानावर जेवण वाढण्याची परंपरा अनेक ठिकाणी जपली जाते.तळलेले मोदकही उपलब्धउकडीच्या मोदकाप्रमाणे तळलेले मोदक आणि ओल्या- सुक्या नारळाच्या करंज्याही उपलब्ध आहेत. ४४० रुपये किलो असे त्यांचे दर आहेत.अनेकदा बाहेरगावी नेण्यासाठी ओल्या नारळाच्या करंज्यांना पसंती दिली जाते, असे पुराणिक म्हणाले. मोदक खरेदीचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे जोशी यांनी सांगितले.उकडीच्या मोदकांच्या आॅर्डर्स अवघ्या दोन दिवसांत फुल्ल झाल्या. पाच हजारांच्या मोदकांच्या आॅर्डर्स आमच्याकडे आहेत. पहिल्या दिवशीच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोदक खरेदी केले जाणार आहेत. गौरीपर्यंत मोदकांची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू राहणार आहे. - संजय पुराणिकपारंपरिक मोदकच गणेशोत्सवासाठी तयार केले जातात. यंदा आम्ही मोदकांचे दर वाढविलेले नाहीत. आमच्याकडचे दर २० रुपये प्रती नग असेच ठेवलेले आहेत. आमच्याकडे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी एक हजार मोदकांची आॅर्डर आहे. त्यानंतरच्याही आहेत. हे मोदक पुढेही उपलब्ध केले जातील. - केदार जोशी

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव