शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन योजनेला विरोध; शिक्षकांचे राेखले वेतन, डहाणूतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 06:43 IST

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या आयुक्ताने एक नोव्हेंबर २००५  नंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या तरतुदी लागू केल्या.

- हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या डहाणू तालुक्यातील तीन शिक्षकांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेत सहभागी होण्यास विरोध दर्शविल्याने त्यांचे पाच महिन्यांपासूनचे वेतन शिक्षण विभागाने थकविले आहे. याविरोधात मधुकर चव्हाण, श्रीकांत सुकथे व जयवंत गंधकवाड या शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून केंद्र सरकारलाच आव्हान दिले आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या आयुक्ताने एक नोव्हेंबर २००५  नंतर नियुक्ती झालेल्या प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या तरतुदी लागू केल्या. त्या अनुषंगाने १९ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णय जाहीर झाला. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये शिक्षक आमदाराने प्राथमिक शिक्षकांवर राष्ट्रीय पेन्शन योजनेची सक्ती न करण्याबाबत तसेच वेतन न रोखण्याबाबत शिक्षण विभागाला विनंती केली आहे.

त्यावर शिक्षण विभाग आयुक्तांनी पेन्शन योजना आणण्यासाठी कोणावर सक्ती न  करण्याचे निर्देश जिल्हा परिषदांना दिलेले आहेत. त्यानंतरही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेत नोंदणी न करणाऱ्या तसेच खाते न उघडणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे मानधन रोखण्याचे बेकायदा आदेश काढले होते. तीन शिक्षकांचे सहा महिन्यांचे वेतन जुलै महिन्यापासून रोखून धरले. या शिक्षकांनी ॲड. शकुंतला सागवीकर यांच्यामार्फत २२ डिसेंबर २०२२ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्ते नियमित आणि प्रामाणिकपणे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करीत आहेत. त्यांचे वेतन रोखण्याची कारवाई जाचक आणि बेकायदा ठरवून ती रद्द करावी. जुलैपासून रोखलेले वेतन तातडीने सव्याज द्यावे, याबाबत डहाणू पंचायत समिती, पालघर जिल्हा परिषद व   शिक्षण विभागाला न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. 

वेतन थांबविण्याचा निर्णय योग्य नाही, मात्र सरकारची योजना, धोरणांची अंमलबजावणी केली पाहिजे.- भानुदास पालवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., पालघर

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन