शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ला विरोध मावळला, कल्याण तालुक्यात जमीन देण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:43 IST

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास कल्याण तालुक्यातील शेतकरी तयार झाले आहेत. निंबवली येथील शेतकरी राघुबाई पाटील यांनी त्यांची ५६ गुंठे जमीन सोमवारी सरकारला दिली.

टिटवाळा : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास कल्याण तालुक्यातील शेतकरी तयार झाले आहेत. निंबवली येथील शेतकरी राघुबाई पाटील यांनी त्यांची ५६ गुंठे जमीन सोमवारी सरकारला दिली.कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, दानबाव, उतणे, नडगाव, पितांबरेपाडा, चिंचवली, राया, निंबवली, गुरवली या गावांतील १०८ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गात बाधित होत आहे. त्यामुळे शेतजमिनी न देण्यासाठी संघर्ष समिती आणि शेतकरी यांनी अनेकदा तीव्र विरोध केला होता.परंतु, राज्य सरकारकडून बाधित शेतकºयांना २८ नोव्हेंबरपासून जमिनीच्या भावाचा गुणांक एकऐवजी दोन दिला जात आहे. त्यामुळे अडीचपटीचा भाव एकदम पाचपट झाला आहे. प्रतिहेक्टरनुसार निंबवलीत एक कोटी ५५ लाख रुपये, राया येथे तीन कोटी एक लाख, गुरवली आणि चिंचवलीत दोन कोटी ३३ लाख, पितांबरे येथे एक कोटी २२ लाख, नडगाव येथे एक कोटी २६ लाख, उशीद येथे एक कोटी ७३ लाख रुपये दर सरकारने जाहीर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या प्रकल्पासाठी जमीन देण्यास तयार झाले आहेत. त्यासाठी त्यांनी सोमवारी सकाळपासूनच कल्याण येथील दुय्यम सहनिबंधक कार्यालयात गर्दी करत खरेदीखत करण्यास सुरुवात केली आहे.मोठ्या प्रमाणात शेतकरी खरेदीखतासाठी तयार झाले आहेत, अशी उपविभागीय अधिकारी प्रसाद उकर्डे व तहसीलदार अमित सानप यांनी दिली.