शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

हिंदीला राजभाषेचा दर्जा देण्यास दाक्षिणात्यांचा विरोध - जगदीश पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 20:47 IST

माय मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी हिंदी ही राजभाषा आहे. राजभाषेची भगिनी मराठी भाषा संबोधली जाते. मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही.

कल्याण, दि.14 - माय मराठी ही महाराष्ट्राची भाषा असली तरी हिंदी ही राजभाषा आहे. राजभाषेची भगिनी मराठी भाषा संबोधली जाते. मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नाही. तोच दुजाभाव आजर्पयतच्या सत्ताधा-यांनी हिंदीच्या बाबतीत केला आहे. हिंदी भाषेला आपण राजभाषा म्हणतो. पण तिला अद्याप राजभाषेचा दर्जा दिलेला नाही. हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला जाऊ नये यासाठी दाक्षिणात्यांचा विरोध आहे,अशी खंत मुंबई हिंदी भाषा सभेचे सदस्य जगदीश पाटील यांनी येथे व्यक्त केली. अखिल हिंदी भाषी संस्थेतर्फे हिंदी दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावचा संदेश देत रॅली काढण्यात आली होती.या वेळी पाटील यांनी उपरोक्त खंत व्यक्त केली. पाटील म्हणाले की, आज हिंदी दिन आहे. त्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी हिंदी भाषा बोलली पाहिजे. मातृभाषा मराठी असली तरी हिंदीलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. हिंदी भाषेच्या वेगवेगळ्य़ा विषयांच्या परिक्षा होत असतात. त्या परिक्षा देऊन विद्याथ्र्यानी आपले ज्ञान वाढविले पाहिजे. शाळेमध्ये हिंदी दिनानिमित्त निबंध आणि वकतृत्व स्पर्धा घेतल्या पाहिजेत. हिंदी भाषेला आपण राजभाषा म्हणत असलो तरी तिला अजून ही राजभाषेचा दर्जा मिळालेले नाही. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यास दाक्षिणात्य लोक विरोध करीत आहे. मातृभाषेला स्वीकारणो जसे गरजेचे आहे. तसेच देशाची प्रमाणित भाषा असावी. संपूर्ण भारतातून हिंदीला राजभाषाचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.     शाळा कोणत्याही माध्यमाची असली तरी अभ्यासक्रमात हिंदी विषय हा असतोच. हिंदीविषयी गोडी निर्माण व्हावी आणि सर्वधर्मसमभाव मुलांमध्ये रूजावा या उद्देशाने या रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत पाचवी ते नववीचे 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुस्लीम, हिंदू, बौदध, पंजाबी, मराठी, गुजराती  भाषिकांची वेशभूषा विद्याथ्र्यानी परिधान केली होती. शिवाजी चौकातून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर सहजानंद चौक, आग्रा रोड, लालचौकी, शारदा मंदिर या मार्गी रॅली गेली. शारदा मंदिरात रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मानवअधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज हुड्डा, हिंदी लेखक ओमप्रकाश पांण्डेय आदी मान्यवर उपस्थित होते.     हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संतोष गुप्ता, सचिव संतोष पाठक, आर. डी. पाटील, शारदा मंदिर स्कूलचे सहाय्यक शिक्षक उमेश काळे, सरस्वती विद्यालयाचे पर्यवेक्षक अंकुर आहेर यांनी मेहनत घेतली.