शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्ष नेत्याच्या मुलीचे पाणी प्रश्नावर आयुक्तांच्या दालनात केले ठिय्या आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:18 IST

मुंब्रा प्रभागातील शिवाजी नगर, दरगाह रोड,एम के कंपाऊंड, दादी कॉलोनी तसेच पिंट्या दादा मैदान परिसरात गेले महिनाभर प्रचंड पाणी समस्या भेडसावत आहे.

मुंब्रा-कौसा भागातील पाण्याच्या समस्येवर तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले होते. त्यानंतर पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांनीही दुसर्‍याच दिवशी कामाला सुरुवात करण्याचे जाहीर केले होते. मात्र, 15 दिवसांनंतरही पाणी समस्या निकाली न निघाल्याने नगरसेविका फरझाना शाकिर शेख  आणि  मर्झिया शानु पठाण यांचा आयुक्त दालना बाहेर हल्लाबोल केला. पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेरच त्यांनी जवळपास तासभर ठिय्या आंदोलन केले.

मुंब्रा प्रभागातील शिवाजी नगर, दरगाह रोड,एम के कंपाऊंड, दादी कॉलोनी तसेच पिंट्या दादा मैदान परिसरात गेले महिनाभर प्रचंड पाणी समस्या भेडसावत आहे. या भागात पाणीपुरवठा खंडीत होणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, अशा समस्या भेडसावत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी अधिकार्‍यांसह पाहणीदौरा केला होता. त्यानंतर आयुक्तांशीही चर्चा केली होती. या पाहणी दौर्‍यानंतर जमिनीखाली दबलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती अशक्य असल्याने नवीन जलवाहिन्या टाकण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, पंधरा दिवसानंतरही या समस्येवर तोडगा काढण्यात येत नसल्याने सोमवारी दुपारी मर्झिया पठाण आणि फरझाना शाकीर शेख या आयुक्तांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडविल्यानंतर या दोघींनीही आयुक्तांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन केले.यावेळी पाणीपुरवठा खात्याच्या अधिकार्‍यांनी नियोजनबद्ध आखणी करुन बुधवारपासून कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

यावेळी मर्झिया पठाण यांनी सांगितले की, येथील पाण्याची समस्येवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी सागर साळुंखे या अधिकार्‍यांसह रात्री 12 ते दोन वाजेच्या दरम्यान दौरा केला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्या दिसून आल्या. मात्र, त्यांची दुरुस्ती शक्य नसल्याने या जलवाहिन्या नव्याने टाकण्याचे काम करण्याबाबत आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये अधिकार्‍यांनी आश्वासीत केले होते. मात्र, अद्यापही त्यावर काम सुरु झालेले नाही. याचाच अर्थ अधिकारी आयुक्तांच्या आदेशाला महत्व देत नाहीत का? पाणीपुरवठ्याच्या नूतनीकरणासाठी शायोना नावाच्या एका  238 कोटींच्या ठेक्यामध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे मुंब्रा-कौसा भागाला नेहमीच सापत्नपणाची वागणूक दिली जात आहे. महिनाभर पाणी नसल्याने मुंब्रावासियांचे हाल होत आहेत.

नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणे हा संविधानाच्या 21 व्या कलमाचा म्हणजेच मूलभूत अधिकारांचे हनन आहे. त्याविरोधात आपण हे आंदोलन सुरु केले होते. तर, सोमवारी अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत मर्झिया पठाण म्हणाल्या की, पाणी खात्याच्या अधिकार्‍यांनी आपणाला हे आश्वासन नसून आमच्या पाणीटंचाईबाबत नियोजनात्मक काम करण्यात येणार आहे, असे सांगितले आहे.  जर त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही तर आमच्याकडेही नियोजन आहे. ते आम्ही त्यांना दाखवून देऊ, असेही सांगितले

टॅग्स :mumbraमुंब्रा