शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

देवस्थानांच्या सरकारीकरणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:01 AM

‘हिंदू जनजागृती’ची ठाण्यात निदर्शने

ठाणे : शनी-शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनामध्ये सरकारीकरणाचा निर्णय घेऊन राज्य सरकारने हिंदूंच्या भावनांशी खेळू नये. मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारकडून शासकीय समित्या स्थापन केल्या जात आहेत. पण, देवस्थानचे सरकारीकरण सुरू करणे शासनाने वेळीच थांबवणे आवश्यक आहे. या शासकीय समित्यांनी देवांच्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून येथील हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी त्याविरोधात ठाणे स्टेशनवर तीव्र निदर्शने करून निषेध व्यक्त केला.मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांनी त्याचा जाहीर निषेध केला. देवनिधी लुटणाऱ्या व्यक्तींना शिक्षा न देणाºया शासनाला श्री शनैश्वर देवस्थान ताब्यात घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. शासनाने या देवस्थानचे सरकारीकरण तत्काळ रद्द करावे आणि मंदिर पुन्हा भक्तांच्या ताब्यात द्यावे. अन्यथा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा येथील या राष्ट्रीय आंदोलनाच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने देण्यात आला. यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी हातात फलक धरून शासनाविरोधात घोषणा दिल्या.

टॅग्स :thaneठाणेHindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीHinduहिंदूshani shinganapurशनि शिंगणापूर