शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न अधिकारसाठी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 22:37 IST

अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

ठाणे : अंत्योदय कुटुंबाचे अंत्योदय रेशनकार्ड रद्द करून त्यांना प्राधान्य गटात टाकल्याच्या विरोधात अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.दिवाळी आली तोंडावर... रेशन नाही दुकानावर, रेशन बचाव... अच्छे दिन लाव, अच्छे दिन आ गये... गरीबों का राशन खा गये... आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. प्राधान्य गटातील कार्डधारकांना माणसी पाच किलो धान्य मिळते, तर अंत्योदय लाभार्थ्यांना कितीही सदस्य असले, तरी ३५ किलो धान्य मिळत असे. परंतु, आता अंत्योदय कार्डधारकांना प्राधान्य गटातील पाच किलो धान्य मिळणार आहे. आदिवासी, गरीब, कातकरी, कोलाम किंवा विधवा, परित्यक्ता, दुर्धर आजाराने ग्रस्त असणाºया कुटुंबप्रमुखाचे कुटुंब आदींवर शासनाच्या या निर्णयामुळे अन्याय होत आहे. तो त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. ठाण्यासह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर अन्न अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली.अंत्योदय रेशनकार्डधारक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निश्चित केले आहेत. तरीदेखील, या कार्डधारकांना प्राधान्य गटात टाकून न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. या आंदोलनामध्ये अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, भारतीय महिला फेडरेशनच्या गीता महाजन, मतदाता जागरण अभियानाचे अनिल शाळीग्राम, स्वराज अभियानाचे संजीव साने, स्वराज इंडियाचे उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे जगदीश खैरालिया, चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीचे गिरीश साळगावकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला.

दिवाळीत सरकार खानार तुपाशी ....गरीब राहणार उपाशीपालघर, ठाणे, रायगड , नासिक  जिल्ह्यात १३ ऑक्टोबरला सर्व तहसील कार्यलयावर गरिबांच्या अन्न अधिकारासाठी जंबो शिष्टमंडळ निदर्शने करणार आहे. २१ सप्टेंबर रोजी  महाराष्ट्र शासनाने  शिधा पत्रिकेवर १+२ नावे असलेल्या  आदिवासी , कातकरी, विधवा , वृध्द,  गरीबांचे अंत्योदय योजनेचे धान्य कमी करुन दिवाळी सणातच गरीबांवर उपासमारीची वेळ आणली. या मनमाणी शासनाविरोधात श्रमजीवीचे ठाण्यासह चार जिल्ह्यात एकाच वेळी आंदोलन छेडले जाणार आहे.