शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतांसाठी नागरिकत्व कायद्याला विरोध- विनय सहस्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:30 IST

अभ्युदय प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानात काँग्रेसवर निशाणा

डोंबिवली : नागरिकत्व कायद्यामुळे कुणाचेही अस्तित्व धोक्यात येणार नाही. मुस्लिम बांधवांनीही घाबरू नये. मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष या कायद्याला विरोध करून देशात अराजक माजवत असल्याची टीका भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केली. तसेच, राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या क्रांतिकारी निर्णयाच्या समर्थनार्थ पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.अभ्युदय प्रतिष्ठान या संस्थेने ‘नागरिकत्व सुधारणा कायदा भ्रम आणि वास्तव’ या विषयावर टिळकनगर शाळेच्या पटांगणामध्ये शनिवारी व्याख्यान झाले. त्यावेळी सहस्रबुद्धे यांनी या कायद्याविषयी मते मांडली. यावेळी रा.स्व. संघाचे कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विकास मोडक यांनी सहस्रबुद्धे यांचा संस्थेतर्फे सत्कार केला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे नगरसेवक, शहरातील संघ स्वयंसेवक,अभ्युदय प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. सहस्रबुद्धे म्हणाले की, ज्यांना या कायद्याबाबत राजकारण करायचे आहे, त्यांना करू द्या. हा विरोध फार काळ टिकणार नाही. हा निर्णय केवळ भाजपचा नसून दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही या कायद्याची वेळोवेळी गरज व्यक्त केली होती. तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही घुसखोरी रोखण्यासाठी कडक कायदा अमलात आणावा, यासाठी पत्रव्यवहार केले होते. हे सर्व इंटरनेटवर उपलब्ध असून त्याचा जाणकार, अभ्यासक, ज्ञानी लोकांनी अभ्यास करावा, असा सल्ला त्यांनी दिला. मात्र, विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत करण्याचे सोडून केवळ मते मिळणार नाहीत, या भीतीतून विरोध चालवला असल्याचा टोला सहस्रबुद्धे यांनी लगावला.राष्टÑीय नागरिक नोंदणीसंदर्भातही (एनआरसी) निर्णय घेण्यात येऊ शकतो. पण, तो एवढ्यात नाही. हा निर्णय झाल्यानंतही कुणाला भीती वाटण्याचे कारण नाही. ज्या देशात आपण राहतो, तेथे भारतीय आहोत, याची रजिस्टर नोंदणी झाली तर त्यात गैर काय? देशाच्या सुरक्षेसाठी अशी नोंदणी झाली तर वावडे का? असा सवाल सहस्रबुद्धे यांनी यावेळी केला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीला टोलासंसदेत एखादा कायदा, निर्णय बहुमताने संमत होतो, त्याचे पालन राज्यांनी न करणे ही कुठली वृत्ती, असा चिमटाही सहस्रबुद्धे यांनी महाविकास आघाडी सरकारला काढला.मग, संसद हे देशाचे सर्वोच्च मानले जाणारे व्यासपीठ, ठिकाण हवेच कशाला? लोकसभेत मंजुरी द्यायची आणि राज्यसभेत हात आखडता घ्यायचा, हे कुठले धोरण, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे थेट नाव न घेता त्यांना टोला लगावला. जे संसदेत मंजूर झाले, त्याची अंमलबजावणी सर्व राज्यांनी करावी, असेही आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक