शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटित पत्नीचे बनावट खाते उघडून अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:23 IST

घटस्फोटित पत्नीचे बनावट बँक खाते उघडून २० लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका ठगाला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत.

ठाणे : घटस्फोटित पत्नीचे बनावट बँक खाते उघडून २० लाख रुपयांची अफरातफर करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका ठगाला नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या दुसºया पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत.ऊर्मिला गौड यांचा बिजय गौड यांच्याशी १० मे १९८७ रोजी विवाह झाला होता. ऊर्मिला गौड ब्युटीपार्लर चालवत असून त्यांचा मुलगा शिक्षणासाठी परदेशी आहे. दादर रेल्वे पोलीस ठाण्याच्या एका गुन्ह्यामध्ये बिजय सहा महिने तुरुंगात होता. नंतर कुवेत येथील एका कंपनीमध्ये १० वर्षे नोकरी केली. त्यावेळी कंपनीच्या मालकाची फसवणूक करून पैसे घेऊन तो भारतात पळून आला. याला कंटाळून त्यांनी ठाण्याच्या कुटुंब न्यायालयातून ३ जून २०१६ रोजी त्याच्याकडून घटस्फोट घेतला.घटस्फोटानंतर बिजयने रीमाशी दुसरा विवाह केला. १ जुलै २०१६ रोजी त्याने खोपटच्या इंडियन बँकेत स्वत:च्या आणि पहिली पत्नी ऊर्मिलाच्या नावावर खाते उघडले. तेव्हा त्याने पहिल्या पत्नीचे नाव आणि रीमाचा फोटो वापरला. यावेळी रीमाने बनावट सही केली. ऊर्मिलाच्या नावे मुलुंड येथील एलबीएस रोडवरील निर्मल लाइफस्टाइल सोसायटीमध्ये फ्लॅट होता. हा फ्लॅट विकण्यासाठी बिजयने इंडियन बँकेतील बनावट खात्याचा वापर केला. जळगाव येथील रमेश दामू सुशीर यांना त्याने हा फ्लॅट विकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी टोकन म्हणून त्याने सुशीर यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. पहिल्या पत्नीच्या नावे उघडलेल्या बनावट बँक खात्यात ही रक्कम जमा झाल्यानंतर त्याने संपूर्ण रक्कम काढून घेतली.विम्याची रक्कम हडपलीबिजय आणि रीमाने वाशी येथील भारत को-आॅप. बँकेत ऊर्मिला यांच्या नावे आणखी एक बनावट खाते उघडले. मुदत पूर्ण झालेल्या त्यांच्या विमा पॉलिसीची रक्कमही बिजयने हडपली. जानेवारी २०१८ मध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ऊर्मिला यांनी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली होती.

टॅग्स :Crimeगुन्हा