शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीसाठी विरोधकांकडून पुन्हा सत्ताधाऱ्यांवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 16:26 IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांना घरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर आता ठाण्यातही विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी देखील सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावाची आठवण करुन देत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी लावून धरली आहे.

ठळक मुद्देवर्ष उलटूनही प्रस्ताव पटलावर नाही विरोधक झाले पुन्हा आक्रमक

ठाणे - मुंबईत ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षाने पुन्हा एकदा ठाण्यात ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये मालमत्ता कर माफ करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याने आता यापूर्वी मालमत्ता कर माफीचा आपण आणलेला प्रस्ताव पुन्हा येत्या महासभेत आणावा अशी मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी महापौरांकडे केली आहे .                     मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मुंबईत शिवसेनेची कोंडी करत ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ठाण्यात मात्र या करमाफीसाठी सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने निवडणुकीपासून कोणत्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नाहीत. विविध मुद्द्यावर श्रेय घेण्यासाठी मुंबई आणि ठाण्यात सुरवातीपासूनच श्रेय वादाची लढाई सुरु आहे. ठाण्यात मात्र भाजपाची कोंडी करण्यात तसेच वचनपूर्ती करणे सत्ताधारी शिवसेना पक्षाला जमलेली नाही.           मार्च महिन्यात ठाण्याचे महापौर बसल्यानंतर आतापर्यंत झालेल्या महासभेत एकदाही करमाफीचा प्रस्ताव प्रशासनाकडून आणला गेला नाही. याउलट पालिका प्रशासनाकडूनच मालमत्ता करामध्ये १० टक्के कारवाढीचा प्रस्ताव बजेटमध्ये आणण्यात आला होता. जोपर्यंत सभागृहात करमाफीचा प्रस्ताव येणार नाही तोपर्यंत प्रशासकीय कोणत्याच प्रकारच्या हालचाली करता येत नसल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव घोषणा करूनही सत्ताधाºयांकडून आणण्यात येत नसल्याने यापूर्वी झालेल्या महासभेत विरोधकांकांकडूनच मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाबाबत पुढे कोणत्याच प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. मुंबईत आता ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आता ठाण्यात देखील यासाठी विरोधकांनी दबाव आणण्यास सुरु वात केली आली असून करमाफीचा प्रस्ताव येत्या महासभेत घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTaxकर