शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेने अडवलेले मैदान तात्काळ सर्वसामान्यांसाठी खुले करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 16:43 IST

पालिका प्रशासनाचे शाळा व्यवस्थापनाला आदेश, मनसेच्या दणक्यानंतर आठवडाभरात भूखंड मोकळा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सर्वसामान्य ठाणेकरांसाठी आरक्षित असलेल्या मैदानाच्या भूखंडावर सुरु असलेला खासगी शाळेचा खेळ मनसेच्या दणक्यानंतर आटोपला आहे. वसंत लॉन्स गृहसंकुलाजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने मैदान अडवून ठेवल्याने या परिसरातील लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत होते. तसेच नागरिकांना जॉगिंगसाठी उपवन तलावाचा रस्ता धरावा लागत होता. याप्रश्नी मनसेने आवाज उठवल्यानंतर अवघ्या आठ दिवसात खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने न्यू होरायझन स्कॉलर्स स्कुल व्यवस्थापनाला पत्र धाडत मैदान सात दिवसात महापालिकेस हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.    

ठाणे महानगरपालिकेच्या मंजूर विकास आराखडयानुसार वसंत लॉन्सजवळील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलशेजारी ६६००  चौमी (१.६१ एकर) क्षेत्रफळाचे खेळाचे मैदान नियोजित आहे. या मैदानाला शाळेने संरक्षित भिंत उभारून ते बंदिस्त केले आहे. या शाळेच्या आजूबाजूला असलेल्या गांधीनगर, सुभाषनगर, माजिवडा गाव, साईनाथ नगर, चिरागनगर, हरदासनगर या मध्यमवर्गीय लोकवस्तीमधील मुलांना त्यांच्या हक्काचे खेळाचे मैदान खुले नसल्याने रस्त्यावरच खेळाचा 'डाव' मांडावा लागतो. मात्र मैदानच खुले नसल्याने मुलांनी खेळायचे कुठे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी याप्रश्नी आवाज उठवला. या जागेवर न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलने अतिक्रमण केलेले आहे. पालिकेच्या शहर विकास विभागामार्फत याबाबत स्पष्ट निर्देश असताना देखील शाळेने मैदानाचा वापर स्वत: करिता केलेला आहे. तसेच मैदान ठाणे पालिकेस हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे आठ दिवसात मैदान सर्वसामान्यांसाठी खुले न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा दणका दिला जाईल, अशा इशारा संदीप पाचंगे यांनी दिला होता. याबाबत पाचंगे यांनी ठाणे महापालिका आयुक्त, महापौर, शिक्षण समिती सभापती आणि न्यू होरायझन स्कॉलर्स शाळेच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यव्हार करताच जागे झालेल्या ठाणे पालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचना विभागाने शाळा व्यवस्थापनाला पत्र धाडले. या मैदानाचा सार्वजनिक वापर होणे आवश्यक असताना ते खुले केलेले नाही. संबंधित मैदान सर्वसासामान्यांसाठी खुले करावे अथवा महापालिकेस सात दिवसात हस्तांतरित करावे, असे स्पष्ट आदेश पालिका प्रशासनाने शाळा व्यवस्थापनाला पत्राद्वारे दिले आहेत.इतर शाळांनी सावध व्हावे!ठाण्यातील विविध  शाळांनी अशाच पद्धतीने बेकायदा बांधकामे केली आहेत. त्यांची यादी मनसेकडे असून विद्यार्थ्यांना तसेच स्थानिकांच्या हक्कांच्या आड येणाऱ्या शाळांना भविष्यात मनसे स्टाईल दणका दिला जाईल. - संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, मनविसे

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका