शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गणपती आणताना केवळ तिघांना परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 03:03 IST

घरोघरी दर्शन टाळा : मंडपात थर्मल स्कॅनर, पल्स आॅक्सिमीटरची तपासणी सक्तीची

ठाणे : घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास अनुमती देताना ठाणे महानगरपालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार, घरगुती गणपती आणताना व विसर्जन करताना तीनपेक्षा जास्त मंडळींना परवानगी नसेल. घरोघरी जाऊन गणपती दर्शन घेणे टाळावे. घरीच विसर्जन करावे, मात्र तसे शक्य नसेल तर विसर्जनस्थळी आरती करु नये. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये थर्मल स्कॅनर आणि पल्स अॉक्सिमीटरच्या साहाय्याने तपासणी बंधनकारक केली असून मंडपात येणाऱ्या प्रत्येकाची नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे.

यंदा घरगुती गणपतीच्या मूर्तीची उंची दोन फुटांपर्यंत तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चार फूट उंच मूर्तीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले. घरगुती गणपतीसाठी मूर्तीचे आगमन व विसर्जन करताना मिरवणूक काढण्यास बंदी केली आहे. आगमनाच्या आणि विसर्जनाच्यावेळी जास्तीत जास्त तीन लोक असावेत. सजावट पर्यावरणपूरक तसेच कमी असावी. दर्शनासाठी घरोघरी भेटी टाळाव्यात, विसर्जनस्थळी नागरिकांनी कमी वेळ थांबावे, घरीच आरती करून घाटावर केवळ विसर्जन करावे, अशा सूचना केल्या आहेत.मोठ्या गृहसंकुलांनी त्यांच्या संकुलातील गणेश मुर्तीचे विसर्जन सिंटेक्सच्या मोठ्या टाकीमध्ये करावे व निर्माल्य स्वतंत्र जमा करून विल्हेवाटीसाठी महापालिकेकडे सुपूर्द करावे, नागरिकांनी शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पुजावी व घरच्या घरी बादलीमध्ये विसर्जन करावे, पीओपी मूर्ती बसवल्यास विसर्जनासाठी अमोनिया बायकार्बोनेटचा वापर करावा, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करणे टाळावे, असे आवाहन केले आहे. मात्र तरीही गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला तर तो कमीतकमी दिवस साजरा करावा, गणपतीची मूर्ती चार फुटाच्या पेक्षा जास्त मोठी नसावी, मंडळांनी मंडपामध्ये दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य असून मंडपामध्ये थर्मल स्कॅनर, पल्स अॉक्सिमीटरच्या माध्यमातून भाविकांची तपासणी करावी, त्यांची नोंद ठेवावी, मंडपामध्ये पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मंडपामध्ये प्रत्येकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. मंडळाने दर्शनासाठी केबल नेटवर्क, अॉनलाइन अथवा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्यवस्था करावी. मिरवणूक, अन्नदान, महाप्रसाद आदी कार्यक्रमाना मनाई करण्यात आली आहे. गर्दी होईल अशा जाहिराती न करता आरोग्यविषयक तसेच सामाजिक संदेश असणाºया जाहिराती करण्यात, असेही स्पष्ट केले आहे.सार्वजनिक मंडळांच्या मंडपाची उंचीही १२ फुटांपेक्षा जास्त असणार नाही. हॉटस्पॉट आणि प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाता येणार नाही.मूर्ती दान करण्याच्या स्वीकृती केंद्रांमध्ये वाढच्कोरोना महामारीमध्ये नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती दान करण्याच्या स्वीकृती केंद्रांमध्ये वाढ केली आहे. गेल्यावर्षी महापालिका क्षेत्रात तीन ठिकाणी स्वीकृती केंद्रे निर्माण करण्यात आली होती.च्यावर्षी एकूण २० ठिकाणी केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात यावर्षीही १३ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे, तर सात ठिकाणी विसर्जन घाट तयार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेGanpati Festivalगणेशोत्सव