शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक : चंद्रेशखर टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 17:28 IST

ठाणे : लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली. त्यांचे कर्तुत्वच अलौकीक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या ...

ठळक मुद्देचरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक : चंद्रेशखर टिळकस्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकप्रिय वाक्याने टिळक ओळखले जातातलोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली

ठाणे : लोकमान्य टिळकांनी भारतीय राजकारणाची व्याख्या बदलली. त्यांचे कर्तुत्वच अलौकीक होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या लोकप्रिय वाक्याने टिळक ओळखले जातात. संपूर्ण आशिया खंडात ‘मिळवायचा’ हा शब्द वापरणारे भारतीय राजकीय एकमेव नेते तसेच, पुर्ण वेळ राजकारणी असताना चरितार्थासाठी राजकारणावर अवलंबून नसलेले एकमेव राजकारणी म्हणजे टिळक असे मत अर्थतज्ञ, लेखक चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले.           ठाणे नगर वाचनमंदिरातर्फे वा. अ. रेगे सभागृहात‘असे ही लोकमान्य’ या विषयावर चंद्रशेखर टिळक यांचे सोमवारी जाहीर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. दोन तासांच्यावर कार्यक्रम नसावा हा दंडक टिळकांनी घातला. टिळकांचे विविध पैलूंचे वर्णन करणाऱ्या पुस्तकांपासून व्याख्यानाची सुरूवात करण्याचा मानस चंद्रशेखर टिळक यांनी यावेळी व्यक्त केला. गोविंदराव चळवळकर यांनी त्यांच्या पुस्तकाचे नाव ‘बाळ गंगाधर टिळक’ हे नाव का ठेवले असा त्यांना एकदा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकमान्य टिळकांना कोणतेही विशेषणे लावले तरी ते अपुरे आहे असे उत्तर त्यांनी दिले. प्रभाकर पुजारी यांनी भारतीय संस्कृती योगी लोकमान्य टिळक हे पुस्तक लिहीले आहे त्यात दहा प्रकरणे आहेत. त्याचे शिर्षक लक्षात घेतले तर त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लक्षात येते. जनतेने चिळकांच्या बचावासाठी एकापेक्षा अधिक वेळा पैसा उभा केला होता. परंतू त्यांनी तो स्वत:साठी कधी न घेता विश्वस्त निधी म्हणून ठेवला आणि त्याचा हिशोब ते केसरीमधून मांडत होते. पैसा फंड ही संकल्पना टिळळकांनी सुरू केली नाही तर ती पिंपरी - चिंचवडमधील एका समुहाने सुरू केली. पैसा फंडवाली मंडळी चांगल्या अर्थाने टिळकांच्या मागे हहोती. त्यावेळी टिळक त्यांना म्हणाले तुमचे काम चांगले आहे, ‘मी तुमच्या मंडळावर आलो तर ब्रिटीशांची गैरनजर तुमच्या मंडळावर पडेल, तुम्ही असे काही करु नका पण तुम्हाला हवे तेथे तुम्ही माझे नाव वापरा’. आपल्या नावामुळे पैसा मिळत असेल तर त्याचे उत्तरदायित्व टिळकांवर होते. पैसा फंडची प्रत्येक बॅलेन्सशीट प्रत्येक आठवड्याला केसरीमध्ये छापून येत यावरुन त्यांचे द्रव्यशुद्धयोगीपण दिसून येते. कामगारांचे पहिले नेते हे लो. टिळक होते. कामगारांना आठ तासांची ड्युटी याचे जनक टिळकच. टिळक म्हणायचे वाढवायचा असेल तर जेवणाची वेळ वाढवा, त्यामुळे आता जो एक तासांचा लंचब्रेक आहे त्याचे जनक टिळक आहेत. आज सहा महिने प्रेग्नन्सी लिव्ह दिली जाते त्याचे सुतोवाच टिळकांनी दिले होते. टिळकांना स्वराज्य हवे होते पण ते स्वत:साठी कधीही नाही. ‘टिळक हे वेगवेगळ््या पद्धतीने विचार करीत असे. सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडताना टिळक म्हणाले की धर्माचे अधिष्ठान राष्ट्राला हवे, धर्माचा पेहराव नको असे प्रतिपादन चंद्रशेखर टिळक यांनी शेवटी केले. यावेळी ठाणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष केदार जोशी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकMumbaiमुंबई