शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
4
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
5
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
7
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
8
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
9
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे
10
VIRAL : भावाच्या लग्नासाठी कंपनीने सुट्टी नाकारली, त्यानं काय केलं बघाच! आता सगळेच कंपनीला ठेवतायत नावं 
11
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
12
भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू
13
"याच्यासाठी दादांनी आयपीएस ऑफिसरला झापलं"; अंजली कृष्णा यांना अडवणाऱ्याचा सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
14
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
15
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
16
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार का? कर तज्ज्ञ आणि सीए संघटनांनी काय केली मागणी?
17
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
18
रशियाच्या निशाण्यावर नक्की कोण? रहिवासी भागात डागले ड्रोन, पण झेलेन्स्कींशी आहे थेट कनेक्शन!
19
मंदिरात फुलांच्या रांगोळीतून ऑपरेशन सिंदूर आणि भगवा ध्वज काढल्याने केरळमध्ये वाद, संघाच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल
20
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?

प्रचाराला उरले केवळ पाचच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 23:42 IST

शेवटच्या टप्प्यात ठाकरे बंधूंच्या ठाण्यात सभा : सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचार पोहोचला शिगेला

ठाणे : रविवारच्या सुटीचा फायदा घेऊन सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचाराचा धडाका उडविल्यानंतर आता सकाळी प्रचार करण्याऐवजी सायंकाळच्या प्रचाररॅली, चौकसभांवर भर देण्यास उमेदवारांनी सुरुवात केली आहे. मतदारयाद्यांतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे कसब पणाला लागले आहे. याशिवाय, पहिल्या टप्प्यात राष्टÑवादीचे शरद पवार यांनी तोफ डागल्यानंतर अंतिम टप्प्यात ठाकरे बंधूंची तोफ ठाणे शहरात धडाडणार आहे. उद्धव ठाकरे १७, तर राज ठाकरे हे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १९ आॅक्टोबरला सभा घेणार आहेत. त्यामुळे हे दोघे बंधू एकमेकांविषयी काय बोलतात, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, याची जाणीव होऊ लागली आहे. पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी महायुतीचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर, मुंब्य्रात १६ आॅक्टोबरला कन्हैय्या कुमार यांची सभा झाली आहे.

आता प्रचाराला अवघे पाचच दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने विविध संस्था, कमिट्या, सोसायट्या, हा समाज तो समाज आदींचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. तसेच प्रचाररॅली आणि चौकसभा घेण्यावर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. सकाळच्या सत्रात विविध संस्थांच्या गाठीभेटी, चर्चा आदींवर भर दिला जात असून सायंकाळी ४ वाजल्यानंतरच प्रचाराचा धुराळा उडताना दिसत आहे. ठाणे शहर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे, कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस, तर मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना अशा लढती होत आहेत. त्यामुळे या लढतींकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. आपला प्रचार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्याने हजेरी लावावी, अशी प्रत्येक उमेदवाराची इच्छा आहे. त्यासाठीदेखील फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानुसार, राष्टÑवादीकडून शरद पवार यांनी हजेरी लावली. त्यामागोमाग नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा ठाण्यात झाली आहे.

काँग्रेस नेत्यांची ठाण्याकडे पाठकाँग्रेसचे ठाण्यातील दोन मतदारसंघांत उमेदवार उभे आहेत. त्यांच्याकडून प्रचाररॅली, चौकसभा घेतल्या जात आहेत. आधीच ठाण्यासह जिल्ह्यात काँगे्रसला गळती लागली आहे. त्यामुळे पक्षाला उभारी देण्यासाठी किंबहुना उभ्या असलेल्या उमेदवारांचा उत्साह वाढविण्यासाठी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी हजेरी लावणे गरजेचे होते. मात्र, पहिल्या टप्प्यासह शेवटच्या टप्प्यातही काँग्रेसचे वरिष्ठ नेते येणार नसल्याची माहिती समोर येत आहे.दोन भावांतच बिग फाइटठाण्यातील सभा आता जवळजवळ संपल्या आहेत. परंतु, मुख्य सभा शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. यामध्ये शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची १७ आॅक्टोबर रोजी सायंकाळी श्रीनगर भागात सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.उद्धव ठाकरे ठाण्यात काय बोलणार हे पाहणे आणि राज ठाकरे यांनी आधीच हीच वेळ आहे, असे म्हणत शिवसेनेची खिल्ली उडवल्यामुळे त्याचा पलटवार या सभेत होईल, असे बोलले जात आहे. परंतु, त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच १९ आॅक्टोबर रोजी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही सभा ठाण्यात होणार आहे.राज ठाकरे या सभेत पलटवार करतील, असेही बोलले जात आहे. नाही म्हणायला राज यांच्या जिल्ह्यात कल्याण-भिवंडीत सभा झालेल्या आहेत. एकूणच यामुळे खऱ्या अर्थाने दोन भावांमधील बिग फाइट भाषणांच्या निमित्ताने का होईना ठाणेकरांना बघायला मिळणार आहे.

टॅग्स :thane-acठाणे शहर