शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

पहिली लस घेणाऱ्या डॉक्टरच निघाल्या कोरोना पॉझिटिव्ह, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 08:17 IST

अंबरनाथ शहरात कोविडची लस घेणाऱ्या पहिल्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या डॉक्टरांनी लस घेऊन कोविड लसीचा प्रारंभ केला त्यात अंबरनाथमधील या डॉक्टरांचा समावेश होता.

- पंकज पाटीलअंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोविडची लस घेणाऱ्या पहिल्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या डॉक्टरांनी लस घेऊन कोविड लसीचा प्रारंभ केला त्यात अंबरनाथमधील या डॉक्टरांचा समावेश होता. त्या डॉक्टरांनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही त्या सुरक्षित राहू शकल्या नाहीत हे आता उघड झाले आहे.अंबरनाथ व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी वाडेकर यांनी कोविड काळात फ्रंटवर राहून कोविडवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. कोविड काळात झपाटून काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी यांना कोविड लसीकरण मोहिमेदरम्यान पहिली लस घेण्याचा मान देण्यात आला होता. ही लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर दुसरी लसही त्यांनी घेतली. पहिली लस घेतल्यावर त्या स्वतःला सुरक्षित समजत होत्या. कोरोनाची लस घेतल्यावर कोविडची लागण होणार नाही, अशी समजूत प्रत्येकाला होती. मात्र डॉ. शुभांगी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यांना कोविडची लक्षणे आढळल्याने त्यांनी चाचणी करून घेतली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचारही सुरू केले आहेत. मात्र ज्या डॉक्टरांनी कोविडची पहिली लस घेऊन लसीकरणाचा प्रारंभ केला त्याच डॉक्टर कोविडपासून सुरक्षित राहू न शकल्याने आता या लसीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. २०० ते २५० जण घेतात रोज लसलसीकरणाच्या मोहिमेदरम्यान रोज दोनशे ते अडीचशे नागरिक लस घेत आहेत. मात्र लसीचे दोन डोस झाल्यानंतरही नागरिक १०० टक्के सुरक्षित राहतील याची हमी आता कोणीही देऊ शकत नाही, हे डॉक्टर शुभांगी यांच्या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसambernathअंबरनाथ