शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पावसाने विश्रांती घेतल्यावरच, रस्त्याची दुरुस्ती; उल्हासनगरातील खड्ड्यावर दगड मातीचा उतारा

By सदानंद नाईक | Updated: July 25, 2023 18:28 IST

उल्हासनगर महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली.

उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वीचा रस्त्यातील खड्डे न भरल्याने, संततधार पावसाने रस्त्याची दुरावस्था झाली. रस्त्यातील खड्ड्यावर उतारा म्हणून दगड, मातीने खड्डे भरण्यात येत असून वाहनचालकांनी यावर नाराजी व्यक्त केली.

 उल्हासनगर महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली. मात्र संततधार पावसामुळे खड्डे भरण्यास अडथळे येत असल्याने, खड्डे मोठे दगड, रेती व मातीने तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. पावसाने विश्रांती घेतल्यावर रस्ते दुरुस्तीला सुरवात करण्यात येणार असल्याचे जाधव म्हणाले. दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरले असतेतर, रस्त्याची दुरावस्था झाली नसती. अशी संतप्त प्रतिक्रिया रिक्षा चालक व नागरिक देत आहेत. हिराघाट कडून महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकी गाड्या पडून दररोज अपघात होत आहेत. तसेच वाहने नादुरुस्त होत असल्याची प्रतिक्रिया वाहनचालक देत आहेत.

 दुरावस्था झालेले रस्ते शहरातील हिराघाट रस्ता, पवई चौक ते विठ्ठलवाडी रस्ता, सुभाष टेकडी परिसरातील रस्ते, नेताजी चौक ते कुर्ला कॅम्प रस्ता, व्हीनस चौक ते एसएसटी कॉलेज रस्ता, मोर्या नगरी रस्ता, खेमानी परिसरातील रस्ते, गायकवाड पाडा रस्ता, शांतीनगर ते डॉल्फिन क्लब रस्ता यांच्यासह सिमेंट काँक्रीट रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. महापालिका रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच एमएमआरडीए कडून बांधण्यात येणाऱ्या रस्त्याची चौकशी झाल्यास, मोठा झोल बाहेर पडणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता संदीप जाधव यांनी रस्त्यातील खड्ड्याची पाहणी गेल्या आठवड्यात करून, संततधार पावसाने दगड, मातीने रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचे आदेश दिले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर