शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

ठाणे जिल्ह्यात फक्त 50,260 लसींचा साठा राहिला शिल्लक; १ मेचा मुहूर्त हुकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 23:33 IST

१ मेचा मुहूर्त हुकणार : जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी लसीकरण बंद

ठाणे : ठाण्यासह जिल्ह्यात लसीकरणाचा साठा पुन्हा एकदा अपुरा पडू लागला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी अनेक केंद्रे बंद होती. जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील लसीकरण मोहीम ठप्प होती. ठाण्यात ५६ पैकी केवळ ११ केंद्रांवरच लसीकरण सुरू होते. उर्वरित ४५ केंद्रे बंद होती. जिल्ह्याच्या ठिकाणी शुक्रवारी केवळ ५० हजार २६० लसींचा साठा शिल्लक होता. यामध्ये कोव्हिशिल्डचा अवघा ४१ हजार ८२०, तर कोव्हॅक्सिनचा ८ हजार ४४० लसी शिल्लक आहे. त्यामुळे १ मेपासून लसीकरण कसे करायचे, असा पेच निर्माण झाला आहे.

ठाण्यासह इतर महापालिकांनीदेखील लसींचा साठा मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्यापही तो उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता ठाण्यासह या दोन जिल्ह्यातही लसींचा तुटवडा निर्माण झाला असून, अगदी कमी साठा शिल्लक राहिल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. भिवंडीकडे कोव्हॅक्सिनचे ४५० तर कोव्हिशिल्डचे २३२० डोस, ठाणे महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे अवघे ९० आणि कोव्हिशिल्डचे ३ हजार ६५० डोस आहेत. 

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोव्हॅक्सिनचे ५०० डोस असून, कोव्हिशिल्डचे ६ हजार २८० डोस, मीरा-भाईंदरमध्ये कोव्हॅक्सिनचे २ हजार ७१०, कोव्हिशिल्डचे ९ हजार ४००, नवी मुंबईत कोव्हॅक्सिनचे १ हजार ८७० व कोव्हिशिल्डचे ५ हजार ३६० डोस शिल्लक आहेत. उल्हासनगरमध्ये कोव्हॅक्सिनचे ६४०, कोव्हिशिल्डचे ३ हजार ५९० डोस शिल्लक आहेत. 

ग्रामीण भागात कोव्हॅक्सिनचे २ हजार १८० आणि कोव्हिशिल्डचे ११ हजार २२० डोस शिल्लक आहेत. याच शिल्लक डोसमधून शुक्रवारी लसीकरण करण्यात आले.  त्यामुळे शनिवारी लसींचा साठा मिळाला नाही, तर अनेक ठिकाणची लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसthaneठाणे