शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मराठी भाषा उपक्रमांवर फक्त पाच कोटी खर्च - नरेंद्र लांजेवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 07:06 IST

महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे, तर महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषेविषयी साठीचे धोरण चौदा कोटींचे आहे. मात्र यापैकी नऊ कोटी मराठी भाषेशी निगडित आस्थापनांवर खर्च होतात आणि उरलेले केवळ पाच कोटी रुपये हे भाषाविषयक विविध उपक्रमांवर खर्च केले जातात.

ठाणे - महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे, तर महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषेविषयी साठीचे धोरण चौदा कोटींचे आहे. मात्र यापैकी नऊ कोटी मराठी भाषेशी निगडित आस्थापनांवर खर्च होतात आणि उरलेले केवळ पाच कोटी रुपये हे भाषाविषयक विविध उपक्रमांवर खर्च केले जातात. ते पाहता राज्यात भाषा संवर्धनाच्या दृष्टीने प्रत्येकावर एक रुपयाही खर्च होत नाही, इतकी वाईट स्थिती आहे, असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक नरेंद्र लांजेवार यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले.शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात दुसरे सत्र ‘वाचन संस्कृतीत रूजवण्याच्या विविध वाटा’ या विषयावर पार पडले. त्यावेळी लांजेवार बोलत होते. इंटरनेट-फेसबुक आपल्या हाती आल्यापासून आपण वाचनापासून दूर चाललो आहोत. हल्लीच्या वर्तमानपत्रांमध्ये अग्रलेख असा उल्लेख नसतो. संपादकीय असा शब्द वापरला जातो. मात्र आजच्या मुलांना हे समजत नाही. वर्तमानपत्रांमध्ये छापून येणाऱ्या एखाद्या लेखाबद्दल, नवीन मासिक सुरू झाले किंवा बंद झाले की त्याबद्दलही आपण चर्चा करत नाही. ही चर्चा आपण घडवली पाहिजे. यातून आपले भाषेशी निगडित प्रश्न ऐरणीवर येतील, यासाठी तरी बोलले पाहिजे. यातूनच वाचनसंस्कृती रुजेल आणि वाचक वाढतील. रसिकमन हे खºया अर्थाने ग्रंथालयांनी घडवले पाहिजे, असे लांजेवार या वेळी म्हणाले.प्रकाश देशपांडे म्हणाले, हल्ली शिक्षकांना मुलाखतीदरम्यान काय वाचायला आवडते, असं विचारलं असता गुरुचरित्र, पोथी वाचतो अशी उत्तरे मिळतात. चांगली पुस्तके, पेपर ते वाचत नाहीत. त्यामुळे वाचनसंस्कृती वाढणार कशी, वाचणारा शिक्षक दाखवा आणि हजार रुपये मिळवा, अशी स्पर्धा घेण्याची वेळ आलीआहे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.आईवडिलांनी मुलांना पुस्तक, गोष्टी वाचायला न लावता त्या सांगायला सुरुवात करायला हवी. वाचनसंस्कृती वाढवणे आणि रुजवण्याच्या विविध वाटा उपलब्ध असून आपण त्या अंगीकारल्या पाहिजे, असे लेखक रवींद्र खटावकर यांनी सांगितले. राजेंद्र वैती यांनी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथयानाची माहिती दिली.अनुदानवाढीबाबत अवाक्षर नाहीसध्या वाचनाबद्दल अतिशय निराशाजनक स्थिती आहे. आजही मंत्री तावडे येथे आले, मात्र ग्रंथालयांच्या अनुदानवाढीबाबत ते एक शब्दही बोलले नाहीत. या मुद्द्याला त्यांनी हात घातलाच नाही, अशा शब्दांत प्रकाश देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या