शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

ठाण्यात आढळल्या फक्त १६०० चिमण्या

By admin | Updated: May 16, 2017 00:16 IST

चिऊकाऊच्या गोष्टी यापूर्वीच कालबाह्य झाल्या आहेत. आता एक घास चिऊचा, एक माऊचा हेही नामशेष झाले. आता चिमण्यांचीच संख्या इतकी झपाट्याने घटली आहे की

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चिऊकाऊच्या गोष्टी यापूर्वीच कालबाह्य झाल्या आहेत. आता एक घास चिऊचा, एक माऊचा हेही नामशेष झाले. आता चिमण्यांचीच संख्या इतकी झपाट्याने घटली आहे की, ठाणे शहरातील चिमणीगणनेत केवळ १६०० चिमण्या आढळल्या. काही वर्षांनंतर चिमणी पाहण्यासाठी ठाणेकरांना राणीच्या बागेत जावे लागेल किंवा डॉक्युमेंटरीत चिमणी पाहण्यावर समाधान मानावे लागेल, असे पक्षिनिरीक्षकांचे म्हणणे आहे.प्रथमच ‘ठाणे चिमणीगणना’ ही मोहीम राबवण्यात आली. या १० दिवसांच्या गणनेत पक्षिनिरीक्षकांना १६०० चिमण्या आढळून आल्या. हे प्रमाण कमी होण्यामागे शहरातील वाढत्या वाहतुकीमुळे होणारे वायुप्रदूषण आणि वाढत चाललेले ध्वनिप्रदूषण ही कारणे असल्याचे ‘होप’ संस्थेतर्फे सांगण्यात आले. होप संस्था आणि पर्यावरण दक्षता मंडळातर्फे नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी ठाणे शहरातील दोन किमी अंतरावरचे २३ रस्ते निवडण्यात आले. या गणनेत ५० पक्षिनिरीक्षक व ८० पक्षिप्रेमी सहभागी झाले होते. प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ४ ते ६ अशी दोन तासांची वेळ ठरवण्यात आली होती. चिमण्या कमी झाल्याचा आढावा घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. त्यात आयोजकांना १६०० चिमण्या आढळून आल्या. सकाळी चिमण्या अधिक, तर संध्याकाळी चिमण्या कमी हे विशेष निरीक्षण निरीक्षकांनी नोंदवले. या गणनेत काही ठिकाणी नरांची संख्या अधिक आणि मादींची संख्या कमी, तर काही ठिकाणी मादी अधिक आणि नर कमी संख्येने आढळून आले. हे प्रमाण पाहिले तर २ : १ असे आढळले. ज्या ठिकाणी जास्त वाहतूक आणि खूप रहदारी आहे, त्या भागात एका हेक्टरमध्ये तीन चिमण्या, तर ठाणे महाविद्यालयातील परिसर, खाडीची बाजू, टिकुजिनीवाडी यासारख्या कमी वर्दळ असलेल्या ठिकाणी एका हेक्टरमध्ये १० ते १२ चिमण्या आढळून आल्या. ज्या शहरांत चिमण्यांची संख्या अधिक असते, अशा शहरांत एका हेक्टरमध्ये १०० चिमण्या असे प्रमाण असते. त्यामुळे जास्त चिमण्यांच्या शहरांच्या तुलनेत ठाण्यात चिमण्यांची संख्या कमी झाल्याची वस्तुस्थिती असल्याचे होप संस्थेचे विश्वस्त डॉ. शशिकुमार मेनन यांनी सांगितले. जेथे वाहनांचा आवाज अधिक आहे, तिथे चिमण्यांचे वास्तव्य कमी दिसून आले, ज्या सोसायट्यांत चिमण्यांना पाणी आणि खाद्य ठेवले, तेथे त्यांची संख्या थोडी अधिक आढळली. जिथे खुले मैदान, गवत आहे, वाहतूक आहे, अशा ठिकाणीही चिमण्यांची संख्या जास्त आढळल्याचे त्यांनी सांगितले. येऊरमधील लॅम्प शेड, फ्लायओव्हर पाणी जाण्याच्या मार्गातही चिमण्यांचे घरटे आढळले. ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होते, तेथे चिमण्या नाहीत. सकाळी कदाचित त्या येत असाव्यात, पण दिवसा उडतउडत दुसरीकडे स्थलांतरित होत असाव्यात, असा अंदाज त्यांनी वर्तवला.