शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांच्या केवळ १४० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 04:28 IST

रस्त्यांवर करोडो रुपये खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात त्यांची चाळत होते. रस्त्यांतील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवितास मुकावे लागत आहे.

सुरेश लोखंडेठाणे : रस्त्यांवर करोडो रुपये खर्च होऊनही प्रत्येक पावसाळ्यात त्यांची चाळत होते. रस्त्यांतील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीवितास मुकावे लागत आहे. याचे गांभीर्य ओळखून स्थानिक प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी खड्डे दिसताच त्यांची तक्रार ठाणे जिल्हा विधी सेवा सचिवांकडे करण्याची व्यवस्था आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केलेल्या या व्यवस्थेकडे जिल्ह्यातील केवळ १४० जणांनी वर्षभरात खड्ड्यांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत.

खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने जनतेच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांना ‘नोडल अधिकारी’ म्हणून नियुक्ती केले आहे. जनहित याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयास बरोबर एक वर्ष पूर्ण झाले. चांगल्या रस्त्यांसाठी नागरिकांनी तक्रारी करून संबंधित प्रशासनाला धारेवर धरणे अपेक्षित होते. पण, रस्त्यांतील खड्ड्यांच्या तक्रारी करणाऱ्यांसाठी नागरिकांचा निरुत्साह असल्याचे वर्षभरातील पाहणीतून उघड झाले. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही प्रशासनाच्या निष्काळजी व अर्थपूर्ण कामकाजामुळे ठिकठिकाणच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे दिसत आहेत.नागरिकांत निरुत्साहठाणे जिल्हा विधी सेवा सचिवांकडे नागरिकांनी चांगल्या रस्त्यांसाठी तक्रारी करून उत्तम दर्जाचे रस्ते तयार करून घेणे गरजेचे आहे. यासाठी ठाणे येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिवांना ‘नोडल अधिकारी’ यांच्याकडे रीतसर तक्रार करण्याचा हक्क न्यायालयीन निर्णयामुळे मिळाला आहे.ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भार्इंदर या सहा महापालिका आणि अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर दोन नगरपालिकांमधील रस्त्यांचे खड्डे, दुरवस्थेच्या तक्रारी नागरिकांना करता येतील. पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार आणि पालघर नगरपालिका क्षेत्रांतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा पाठपुरावा करून प्रशासनाला धारेवर धरता येणार आहे. पण, नागरिकांचाही निरुत्साह आढळल्याने खड्डे वाढल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणे