ऑनलाइन, ऑफलाइनमुळे केंद्रांवर होतेय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:34 AM2021-05-03T04:34:49+5:302021-05-03T04:34:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी लसींचा पुरेसा साठा नसल्याने ...

Online, offline causes crowds at centers | ऑनलाइन, ऑफलाइनमुळे केंद्रांवर होतेय गर्दी

ऑनलाइन, ऑफलाइनमुळे केंद्रांवर होतेय गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी लसींचा पुरेसा साठा नसल्याने लसीकरण कमी होत आहे. त्यातच ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय लस घेण्यास येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे .

मीरा- भाईंदर महापालिकेची १२ तर खाजगी ९ अशी सध्या २१ लसीकरण केंद्रे सुरू आहेत. आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात झाल्याने पालिकेने आणखी २७ नवीन लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यासाठी प्रस्ताव पाठवून प्रयत्न चालवले आहेत, परंतु लसच मिळाल्या नाहीत तर केंद्रेही नावालाच ठरणार आहेत. शनिवारपर्यंत शहरात १ लाख ५२ हजार ८५० नागरिकांना लसीचा पहिला डोस तर ३८ हजार ८३९ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देऊन झालेला आहे. एकूण १ लाख ९१ हजार ६८९ डोस देऊन झाले आहेत. त्यातच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जात असलेल्या लसीकरण केंद्रांवर ऑनलाइनच नव्हे तर केंद्रांवर थेट येणाऱ्या नागरिकांचीही केंद्रातच ऑनलाइन नोंदणी करून लस दिली जात आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन लस घेण्यासाठी येणारे नागरिक सकाळच्या वेळातच जास्त येत असल्याने गर्दी होत आहे.

आता १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी उसळत आहे. पालिकेने लसअभावी तसेच अन्य केंद्रांवर गर्दी उसळणार असल्याची शक्यता पाहता केवळ भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयातच लसीकरण केंद्र तूर्तास सुरू केले आहे. तेथेही तरुणांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यातच काही नगरसेवक, नेतेमंडळींचा वशिला असल्यास लसीकरणास प्राधान्य दिले जात असल्याचे आरोपही होत आहेत.

तरुणांमध्ये सध्यातरी लस घेण्याचा उत्साह जाणवत आहे. लसीकरण केंद्रांवर वेळेचे नियोजन शक्य होत नसल्याने लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना काही तास केंद्रातच ताटकळत राहावे लागत आहे. पालिकेने बसण्याची, पाण्याची व्यवस्था केली असली तरी गर्दीत बसून राहणेही कोरोनाची लागण होण्याची धास्ती वाढवत आहे. नोंदणी झटपट व्हावी म्हणून नागरिकांचे केवळ नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांकाच नोंदवला जात आहे.

-----------------------

त्रासाबरोबरच लस मिळाल्याचा आनंदही

पहिली लस घेणाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यात काहींचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. लस घेतल्यावर काहींना ताप, अंगदुखी सारखे प्रकार दिसून येत असले तरी लस मिळाल्याचा आनंदही लोकांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

Web Title: Online, offline causes crowds at centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.