शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

‘संवेदन’चे मालिका लेखनाचे ऑनलाइन गुरुकुल होणार सुरू, लेखक शिरीष लाटकर करणार मार्गदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 01:21 IST

Thane News : शिरीष लाटकर हे गेली २० वर्षे मालिका लेखन क्षेत्रात कार्यरत असून, अनेक लोकप्रिय मालिकांसाठी त्यांनी सुमारे बारा हजारांहून अधिक एपिसोड लिहिले आहेत.

ठाणे : अनेकांना खूप चांगलं लिहिता येतं, पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं, तर ते अधिक वाचनीय, श्रवणीय होतं. या आपल्या लेखनशैलीला अधिक परिपूण करून ज्यांना कोणाला मालिका, चित्रपट अशा मनोरंजन क्षेत्रात लेखक म्हणून काम करायचे असेल, त्यांना संवेदन ट्रेनिंग आणि इन्फोटेन्मेंटच्या वतीने १३ डिसेंबरपासून संवेदन मालिका लेखन या विषयात गुरुकुल सुरू करण्यात येणार असून, यात मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर हे स्वत: यात शिकवणार आहेत.यात मालिकेसाठी कथा कशी निवडली जाते, त्याचा मुख्य प्लॉट सबप्लॉट अशी रचना, कथा विस्ताराच्या पद्धती, कॅरेक्टर आणि त्याचा वेगवेगळ्या रंगछटा फुलवत ते प्रेक्षकांच्या आवडीचं बनविण्यासाठीच्या क्लुप्त्या आणि त्यात कल्पकता कशी आणावी? पटकथा लेखन आणि त्यातील प्रवाह, प्रत्येक कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातून कथा उलगणे, प्रेक्षकांनी जाहिरातीनंतरचा भाग पाहावा, म्हणून हुक पॉइंट्स, कथेतील नाट्यमय घटना आणि वळणं आकर्षक कशी करावी, मालिका लेखक म्हणून स्वत:ची ओळख कशी निर्माण करावी? याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्येकाच्या लिखाणावर वैयक्तिक मार्गदर्शन, तसेच ग्रुप बनवूनही काही सेशन होणार आहेत. दर रविवारी सकाळी ११ ते १ यावेळेत लाइव्ह सत्र आणि आठवडाभर सराव असे तीन महिने उपक्रम चालणार आहे. शेवटी चॅनेलचे पदाधिकारी आणि प्रोड्युसर यांच्यासोबत सत्र होणार आहे. लेखनातून पुढे मालिका क्षेत्रात अनेक संधी आहेत. मनोरंजन सृष्टीचा महत्त्वाचा प्राणवायू असणारा लेखक म्हणून घडू इच्छित असाल, तर अधिक माहितीसाठी ८६६८३३६७६८, ७७१५८३०५७४ यावर संपर्क साधावा. 

टॅग्स :marathiमराठीthaneठाणे