शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबाराला वर्ष पूर्ण, पोलीस उपायुक्त कार्यालयावर महेश गायकवाडसह समर्थकांचा जनमुक मोर्चा

By सदानंद नाईक | Updated: February 2, 2025 20:44 IST

एका वर्षानंतर आरोपी फरार कसा?

सदानंद नाईक उल्हासनगर : राज्यात नव्हेतर देशात खळबळ उडून देणाऱ्या हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणाला २ फेब्रुवारीला ऐक वर्ष झाले. ऐक वर्ष उलटूनही तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड या आरोपीला अटक का नाही? असा प्रश्न करीत महेश गायकवाडसह समर्थकांनी रविवारी पोलीस उपायुक्त कार्यालयावर जनमुक मोर्चा काढला. यावेळी महेश गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देत न्यायची मागणी केली. 

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी २ फेब्रुवारी २०२४ साली रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड व शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जमिनीचा वाद प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी कार्यालयात बोलाविले होते. यावेळी गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांच्यात वाद होऊन गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयात महेश गायकवाड व सहकाऱ्यावर गोळीबार केला. या घटनेचे पडसाद राज्यात नव्हेतर देशात उमटून खळबळ उडाली. गोळीबार करणारे तत्कालीन भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली. तर गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाडसह सहकारी राहुल पाटील यांना प्रथम स्थानिक रुग्णालयात तर नंतर दोघांवर ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

 गेल्या एका वर्षापासून गणपत गायकवाडसह अन्य जण जेल मध्ये आहेत. मात्र आरोपी असलेला वैभव गायकवाड गेल्या एका वर्षापासून फरार आहे. पोलिसांनी वैभव गायकवाड यांच्या विरोधात आउटलूक नोटीस, संपतीची जप्तीची कारवाई केली नाही. तसेच सरकारने एसआयटी व सीआयडी मार्फत तपास सुरु केली नसल्याची खंत महेश गायकवाड यांनी व्यक्त केली. गोळीबार घटनेला ऐक वर्ष झाल्या निमित्त महेश गायकवाडसह समर्थकांनी रविवारी दुपारी अनिल-अशोक चित्रपटगृह ते पोलीस उपायुक्त कार्यालय दरम्यान जनमूक मोर्चा काढून फरार आरोपीला अटक करून न्याय देण्याची मागणी केली. मोर्चात महिलासह शेकडो जण सहभागी झाले होते. यावेळी महेश गायकवाड यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी केली.

 बिडच्या धर्तीवर हवा तपास....महेश गायकवाड हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणाला २ फेब्रुवारी रोजी ऐक वर्ष झाले. मात्र यातील वैभव गायकवाड या मुख्य आरोपीला अटक झाली नाही. बीडच्या धर्तीवर तपास होऊन एसआयटी, सीआयडी तपास करण्याची मागणी महेश गायकवाड यांनी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCrime Newsगुन्हेगारी