ठाणे : सेवाभावी ज्येष्ठ नागरीक संघ माजिवडा यांच्यावतीने कवितेच्या वाटेवर या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले. निवेदिका व व्याख्यात्या साधना जोशी यांनी हा कार्यक्र म सादर करताना संत साहित्यापासून ते आजवरच्या हायकू चारोळ््या मूक्तछंदपर्यतचा कवितेचा प्रवास अतिशय रंजक रीतीने सादर केला.संत ज्ञानेश्वर संत तुकाराम बहिणाबाई शांताबाई शेळके, भा. रा. तांबे आदी कवींच्या निवडक कवितांना स्पर्श करत त्याचा सूंदर गोफ गुंफून जोशी यांनी उपस्थितांना दीड तास खिळवून ठेवले. कडक उन्हात कवितेच्या गारव्याची थंडगार झुळूक उपस्थितांना सूखावून गेली. संस्थेचे अध्यक्ष अनिल भदे याच्याकडून नियमतिपणे विविध कार्यक्र मांचे आयोजन संघात केले जाते. त्यापैकी हा एक कार्यक्रम आयोजित केला होता. गदीमा, बोरकर, पाडगावकर, इंदिरा संत, वसंत बापट आदी कवींच्या निवडक कविता अतिशय सराळपणे उलगडत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. मुक्तछंद, विडंबन, वाञटिका, चारोळ््या, ओव्या इत्यादी काव्यप्रकारांचा मागोवा घेत त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कविता कशी रु प बदलत आपल्याला भेटत जाते हे फार रंजकपणे सादर केले. शेवटी सादर केलेल्या आधुनिक पसायदानाने तर उपस्थितांच्या काळजाला हात घातला आणि माणूसपण हरवलयं ही बोच अधिक तीव्र झाली. अध्यक्ष अनिल भदे यांनी आभार मानले
ठाण्यात कवितेच्या वाटेवर एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्न, साधना जोशी यांनी उलगडला कवितेचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 16:07 IST
माजीवाडा सेवाभावी ज्येष्ठ नगारिक संस्था यांच्यावतीने चांगाईमाता मंदिर, माजिवाडा, ठाणे (प.) येथे कवितेच्या वाटेवर या काव्यरु प एकपात्री विनोदी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.
ठाण्यात कवितेच्या वाटेवर एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्न, साधना जोशी यांनी उलगडला कवितेचा प्रवास
ठळक मुद्देकवितेच्या वाटेवर एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्नसाधना जोशी यांनी उलगडला कवितेचा प्रवासहायकू चारोळ््या मूक्तछंदपर्यतचा कवितेचा प्रवास