शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

केडीएमसीत एक प्रभाग, एक नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 00:19 IST

केडीएमसीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक पॅनल पद्धतीने होणार नसल्यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले.

प्रशांत माने कल्याण : केडीएमसीची ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक पॅनल पद्धतीने होणार नसल्यावर शनिवारी शिक्कामोर्तब झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार येऊ घातलेल्या निवडणुकीत एक प्रभाग, एक नगरसेवक याच पद्धतीने प्रक्रिया पार पाडणार आहे. पॅनल पद्धतीबाबत इच्छुकांच्या मनात धाकधूक होती. परंतु, आदेशामुळे संबंधितांना दिलासा मिळाला असलातरी आरक्षणाच्या रचनेत प्रस्थापितांची मात्र चांगलीच कोंडी होणार आहे.केडीएमसीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका पॅनलप्रमाणे झालेल्या नाहीत. त्यामुळे २०२० आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक पॅनल पद्धतीनेच होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. केडीएमसीत सध्या १२२ प्रभाग आहेत. निवडणुकीसाठी पॅनल पद्धत अमलात आली असती, तर प्रभागांची संख्या २९ ते ३२ दरम्यान राहणार होती. परंतु, नगरसेवकांची संख्या १२२ इतकीच राहिली असती. महापालिका क्षेत्रातील लोकसंख्येनुसार येथे कमीतकमी तीन तर जास्तीतजास्त पाच जागांचे पॅनल निवडणुकीत राहिले असते. पॅनल निवडणूक म्हणजे काय, याबाबतची पुरेशी माहिती नसल्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. परंतु, प्रभागनिहाय निवडणुकाच घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानेही शनिवारी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या आरक्षण प्रक्रियेत प्रस्थापितांना धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. लोकसंख्येच्या आधारेच आरक्षणाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण ठरविताना केडीएमसीमध्ये १२२ प्रभागांमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या उतरत्या क्रमाने लावली गेली होती.आरक्षित प्रभागांचा आढावा घेता अनुसूचित जातीसाठी १२, अनुसूचित जमाती तीन आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ३३ जागा राखून ठेवण्यात आल्या आहेत. या आरक्षणात महिलांनाही प्राधान्य दिले असून अनुसूचित जातीच्या आरक्षित असलेल्या १२ जागांपैकी सहा महिला असतील. तर, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आहेत. तर, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी असलेल्या ३३ जागांपैकी १७ जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. दरम्यान, महिलांसाठी ५० टक्के आरक्षण या निकषानुसार सध्या १२२ पैकी ६१ महिला प्रभाग आहेत. दरम्यान, जे प्रभाग २००५, २०१० आणि २०१५ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच महिला प्रभाग म्हणून आरक्षित असतील, ते प्रभाग पुन्हा त्या आरक्षणानुसार राहणार नाहीत. त्यामुळे जे प्रभाग आतापर्यंत खुल्या प्रवर्गातील असतील, त्याठिकाणी संबंधित आरक्षण पडण्याची शक्यता आहे. परिणामी, यात बहुतांश प्रस्थापितांना धक्का बसण्याची शक्यता आहे.विशेष बाब म्हणजे १ जून २०१५ ला २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाल्यानंतर आॅक्टोबरला केडीएमसीची निवडणूक झाली. त्यावेळी झालेल्या आरक्षणरचनेत संबंधित गावांमधील २१ प्रभाग नवीन असल्याने तसेच पूर्वी तेथे कोणतेही आरक्षण नसल्याने त्या निवडणुकीत तेथे सर्वच प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग असे आरक्षित झाले होते.आता तेथे आरक्षण पडणार नाही. त्यामुळे २१ प्रभागांतील एक ते दोन प्रभाग वगळता बहुतांश प्रभाग हे खुल्या प्रवर्गासाठी राहतील, त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीत २७ गावांना विशेष महत्त्व राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

>...तर प्रभागाची रचना बदलेल : २७ गावे केडीएमसीतून वगळा, अशी मागणी सातत्याने होत आहे. जर गावे वगळली तर महापालिकेचे क्षेत्र बदलेल. त्यामुळे प्रभागांची रचनाही नव्याने होईल. लोकसंख्येचे प्रमाणही बदलेल. परिणामी, २१ प्रभाग सरसकट बाजूला होतील. केडीएमसीतील प्रभागांची संख्याही कमी होईल. सद्य:स्थितीला एका प्रभागातील लोकसंख्या १२ ते १४ हजारांच्या आसपास आहे. जर गावे वगळली गेली तर त्यांचे प्रमाण प्रभागनिहाय आठ ते नऊ हजारांच्या आसपास राहील.>नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर आणि कल्याण-डोंबिवली या पाच महापालिकांना राज्य निवडणूक आयोगाकडून शनिवारी आदेश देण्यात आला आहे. त्याप्रमाणे आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी केडीएमसीची निवडणूक एक प्रभाग एक नगरसेवक याप्रमाणे होईल. आरक्षण प्रक्रिया साधारण जुलैमध्ये होईल. आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण प्रक्रिया होईल.- संजय जाधव,नगरसचिव, केडीएमसी