शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर येथील स्फोटात एक गंभीर जखमी, कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:36 IST

Tarapur blast : तारापूर औद्योगिक क्षेत्रात बल्क ड्रग्स बनविणाऱ्या कारखान्यामध्ये एका रिॲक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीवर तारापूर अग्निशमन दलाने काही वेळातच नियंत्रण मिळविले.

बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एन-२१६ मधील बजाज हेल्थकेअर लिमिटेड या कारखान्यांमध्ये शनिवारी दुपारी १च्या सुमारास रिॲक्टरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत एक गंभीर जखमी झाला असून, , त्याला मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर दुसऱ्या किरकोळ जखमीवर तारापूर येथील तुंगा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.तारापूर औद्योगिक क्षेत्रात बल्क ड्रग्स बनविणाऱ्या कारखान्यामध्ये एका रिॲक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीवर तारापूर अग्निशमन दलाने काही वेळातच नियंत्रण मिळविले. मात्र, या घटनेत नीलेश बोरसे (२९ वर्षे) ४० टक्के भाजला असून, त्याच्यावर प्राथमिक उपचार करून ऐरोलीच्या नॅशनल बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी तातडीने हलविण्यात आले आहे, तर महेंद्र दांडे (४५) हा किरकोळ जखमी झाला होता. आग विझविण्यासाठी तारापूर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. स्फोटाच्या निश्‍चित कारणाचा शोध औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अधिकारी करीत आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे, याच कारखान्यामध्ये २ वर्षांपूर्वी विषारी वायुगळतीची दुर्घटना होऊन सुमारे ४० कामगारांच्या डोळ्यांना त्रास झाला होता, तर घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :palgharपालघर