शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्येही सुरू होणार ‘वन रूपी क्लिनिक’, मुंबईत २० स्थानकांवर सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 00:06 IST

मध्य-पश्चिम-हार्बर या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर दिसणाऱ्या मॅजिक दिल या संस्थेचे वन रूपी क्लिनिक लवकरच आता गुजरातमधील अहमदाबाद या रेल्वेस्थानकावरही दिसणार आहे.

पंकज रोडेकरठाणे : मध्य-पश्चिम-हार्बर या गर्दीच्या रेल्वेस्थानकांवर दिसणाऱ्या मॅजिक दिल या संस्थेचे वन रूपी क्लिनिक लवकरच आता गुजरातमधील अहमदाबाद या रेल्वेस्थानकावरही दिसणार आहे. रेल्वे प्रवाशांना तातडीने उपचार देण्यासाठी अहमदाबाद रेल्वेस्थानकाबाबत क्लिनिक सुरू करण्यासाठी मागविलेल्या निविदा प्रक्रियेत एकमेव असलेल्या महाराष्टÑातील मॅजिक दिल संस्थेने बाजी मारली आहे.रेल्वे अपघातात जखमी होणाºया अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळावेत, यातून मध्य रेल्वेवर वन रूपी क्लिनिक सुरू झाले आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत मुंबईत मध्य आणि पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वेमार्गांवर एकूण २० हून अधिक क्लिनिक सुरू झाले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेमार्गावर १३, तर पश्चिम रेल्वेमार्गावर सहा, हार्बरवरील एका रेल्वेस्थानकावर क्लिनिकचा समावेश असून तेथे प्रवाशांना मोफत २४ तास सेवा मिळत आहे. त्यातूनच, क्लिनिकचा पसारा वाढत असताना रेल्वे प्रशासनाकडून या संस्थेकडे गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, रातमल, राजकोट, दहोड, भावनगर या रेल्वेस्थानकांत क्लिनिकद्वारे वैद्यकीय सेवा देण्याबाबत प्रस्तावाद्वारे सुचवले होते. त्यानुसार मॅजिक दिल या संस्थेने निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. या शर्यतीत दोन स्थानिक संस्थाही स्पर्धेत होत्या. मात्र, मॅजिक दिल संस्थेने निविदा प्रक्रियेत बाजी मारल्याने अहमदाबाद येथील रेल्वेस्थानकावर क्लिनिक उघडण्याचा मार्ग सुकर झाला आहे. येत्या १५ दिवसांत अहमदाबाद येथे हे क्लिनिक सुरू होईल आणि तेथील रेल्वे प्रवाशांना वैद्यकीय सेवा देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.>शुक्रवारी मॅजिक दिल या संस्थेला अहमदाबाद रेल्वेस्थानकावर क्लिनिक सुरू करण्याबाबत टेंडर मिळाले. त्यानुसार येत्या १५ दिवसांत वन रूपी क्लिनिक तेथे सुरू करण्यात येईल. महाराष्टÑाबाहेर क्लिनिक सुरू करण्याचे स्वप्न त्यानिमित्त अखेर पूर्ण झाले.- डॉ. राहुल घुले,संचालक, मॅजिक दिल, संस्था