शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

एक वही एक पेन : घरगुती गणेशोत्सवात ज्ञानाची पेटी, आदीवासी विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक मदत

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 5, 2019 15:58 IST

यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ठेवण्यात आली आहे. ठाण्यातील २० कुटुंबियांनी या उपक्रमात भाग घेतला आहे.

प्रज्ञा म्हात्रेठाणे: यंदा घरगुती गणेशोत्सवात दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ठेवून शैक्षणिक साहित्य गोळा करुन ते साहित्य दुर्गम भागातील आदीवासी विद्यार्थ्यांना देण्याचा संकल्प ठाण्यातील २० कुटुंबियांनी केला आहे. गणपतीला हार, फुले, मिठाईपेक्षा वह्या, पेन, पेन्सिल देण्याचे आवाहन त्यांनी केले असून गणेशभक्तांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला.                यावर्षी गणेशोत्सवात इकोफ्रेण्डली आणि समाजप्रबोधन याची सांगड घातली गेली आहे. घरगुती गणेशोत्सवातही सामाजिक भान जपले जात आहे. विकास धनवडे यांच्या संकल्पनेतून यंदा दानाची नव्हे तर ज्ञानाची पेटी ही संकल्पना राबविली आहे. त्यांच्यासह २० घरगुती गणेशोत्सव साजरा करणारे कुटुंब जोडले गेले आहेत. या २० कुटुंबियांनी दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना वह्या, पेन, पेन्सील आणण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे एक वेगळाच पायंडा यंदाच्या गणेशोत्सवात घातला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनवडे यांच्या घरी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यात साडे तीन डझन वह्या आणि ५० पेन ज्ञानाच्या पेटीत दिले. संदीप गोळे, नितीन सुतार, नैना मळार यांसारखे अनेक जणांनी या ज्ञानाच्या पेटीची संकल्पना आपाल्या घरगुती गणेशोत्सवात राबविली आहे. ठाम्यापासून १५० किमी अंतरावर आणि जव्हार पासून ४० किमी अंतरावर वसलेले बेहेरपाडा या आदीवासी गावातील विद्यार्थ्यांना ही मदत पोहोचविली जाणार आहे. ११०० लोकांची ही वस्ती असून या गावात २०४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिवाळीपूर्वी ही मदत या विद्यार्थ्यांना पोहोचविली जाणार असल्याचे या कुटुंबियांनी सांगितले. बेहेरपाडा हा अतिशय दुर्गम भाग असून येथील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. त्या शाळेतून त्यांना पुस्तके मिळतात पण वह्या, पेन , पेन्सील, दप्तरे मात्र मिळत नाही. त्यामुळे त्यांना हे शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प यंदाच्या गणेशोत्सवात आम्ही सर्वांनी मिळून केला असे धनवडे यांनी सांगितले. ही मदत झेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून पोहोचविली जाणार आहे. झेप प्रतिष्ठानने या आधी देखील तेथील गर्भवती महिला, विद्यार्थ्यांना मदत दिली आहे. पुढील पाच वर्षांसाठी त्यांनी हे गाव दत्तक घेतले आहे. तेथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने ती समस्या प्राधान्याने सोडविली जाणार आहे, त्यांसाठी एका खाजगी मोबाईल कंपनीशी चर्चा सुरू आहे. तसेच, रोजगाराचा प्रश्नही युद्धपातळीवर सोडविण्याचा झेप प्रतिष्ठानचा मानस असल्याचे धनवडे यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Maharashtraमहाराष्ट्र