शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्वाईन फ्लुने आणखी एकाचा मृत्यू; २१० रुग्णांची जिल्ह्यात नोंद

By अजित मांडके | Updated: August 5, 2022 16:33 IST

जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही रूग्णसंख्येत वाढ

अजित मांडके, ठाणे | लोकमत न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होत असतांना दुसरीकडे स्वाईनचा फैलाव मात्र वाढू लागल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसात स्वाईनच्या रुग्णात वाढ होत असतांना ठाण्यात आणखी एका मृत्युची नोंद झाली आहे. त्यानुसार ठाण्यातील एकूण मृत्यु हे आता चार झाले आहेत. जिल्ह्यात एकूण पाच मृत्यु आतार्पयत झाल्याचे दिसून आले आहे. तर एकूण रुग्ण संख्या आता २१० झाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यात थैमान घालणाऱ्या स्वाईन फ्लु या आजारामुले आरोग्य यंत्रणावरील ताण वाढू लागला आहे. मागील आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू बाधित रुग्णांची संख्या ३४ इतकी होती. ३ जणांच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत होणारी वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य यंत्रांना प्रयत्नशील आहेत. दरम्यान गुरुवारी ठाणे महानगर पालिका हद्दीत स्वाईन फ्लुने एका रुग्णांचा बळी गेल्याने पालिका हद्दीतील मृतांची संख्या ४ इतकी झाली तर, जिल्ह्यातील मृतांचा आकडा ५ वर गेला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

ठाणे महानगर पालिका हद्दीत गुरुवारी एकाच दिवशी सर्वाधिक ५१ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे रुग्णांची संख्या १४१ वर गेली. तर, मृत्युच्या संख्येत एक ने वाढ झाली असून मृतांची संख्या ४ वर गेली आहे. शहरात शुक्रवारी नोंद करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय ६१ होते. सहव्याधी असलेला हा रुग्ण होता. ताप आणि श्वसनास त्रास होत असल्यामुळे २५ जुलै ला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची चाचणी करण्यात आली तेव्हा तो स्वाईन फ्लू बाधित असल्याचे निष्पन झाले. परंतू, २६ जुलै ला त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडे या रुग्णाच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ कल्याण - डोंबिवली पालिका हद्दीत ८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ३५ वर पोहोचली आहे. त्यातच जिल्ह्यात सध्या ११० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, उर्वरित ९५ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूthaneठाणेDeathमृत्यू